गोरखपूरमध्ये रुग्णालयात आॅक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे 30 जणांचा मृत्यू

गोरखपूरमध्ये रुग्णालयात आॅक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे 30 जणांचा मृत्यू

. मात्र, उत्तरप्रदेश प्रशासनाने फक्त 7 लोकांचा मृत्यू झालाचा दावा केलाय.

  • Share this:

11 आॅगस्ट : उत्तरप्रदेशमधील गोरखपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आॅक्सिजन कमी झाल्यामुळे 36 तासांमध्ये 25 मुलांसह 30 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र, उत्तरप्रदेश प्रशासनाने फक्त 7 लोकांचा मृत्यू झालाचा दावा केलाय.

गोरखपूरमधील बाबा राघदास मेडिकल काॅलेजमध्ये शुक्रवारी अचानक आॅक्सिजनचा पुरवठाच बंद झाला होता. ज्या संस्थेला आॅक्सिजन पुरवठा करण्याचे कंत्राट दिले होते त्यांनी गुरुवारी रात्रीच आॅक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. गुरुवारी याबाबत आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या टेक्निकल टीमने मेडिकल काॅलेज प्रशासनाला आॅक्सिजन पुरवठा संपल्याचं तसं पत्रही पाठवलं होतं. मात्र सकाळपर्यंत आॅक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे रुग्णांची प्रकृती बिघडली. यामुळे 25 मुलांसह 30 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, डीएम राजीव रौतेला यांनी आॅक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला नाही असा दावा केलाय. त्यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच आहे. फक्त 7 चं रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच त्यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 10:44 PM IST

ताज्या बातम्या