#IndiaStrikesPakistan : 'आज कलेजे को मिली शांति', शहीद जवानाच्या पत्नीची प्रतिक्रिया

#IndiaStrikesPakistan : 'आज कलेजे को मिली शांति', शहीद जवानाच्या पत्नीची प्रतिक्रिया

'मोदी सरकाच्या या स्ट्राईकमुळे आज माझ्या काळजाला शांती मिळाली. जसे भारतीय जवानांचे त्यांनी तुकडे केले तसे त्यांचेदेखील तुकडे-तुकडे करा.'

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली. मंगळवारी झालेल्या या कारवाईनंतर उत्तर प्रदेशच्या महराजगंजचे शहीद पंकज त्रिपाठी यांच्या गावी आनंद साजरा होतोय.

शहीद पंकज यांच्या पत्नी त्रिपाठी म्हणाल्या की, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना पकडून-पकडून संपवलं पाहिजे. हा हल्ला तोपर्यंत सुरू राहिला पाहिजे जोपर्यंत संपूर्ण दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही.'

याविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, 'मोदी सरकाच्या या स्ट्राईकमुळे आज माझ्या काळजाला शांती मिळाली. जसे भारतीय जवानांचे त्यांनी तुकडे केले तसे त्यांचेदेखील तुकडे-तुकडे करा.' गेल्या 12 दिवसांआधी दहशतवाद्यांकडून पुलवामामध्ये आत्मघातकी IED हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये भारताने CRFP चे 42 जवान गमावले. त्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. पण त्याचा अगदी योग्य बदला भारतीय सैन्याकडून घेण्यात आला आहे.

हेही वाचा: सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

Air Strikeचा निर्णय मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.

12 दिवसामध्ये मोदींचे पाकला सहा मोठे धक्के

- पुलवामा हल्ल्यामध्ये 100 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

- मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर

- कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू

- काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.

VIDEO : ...म्हणून पहाटे हल्ला केला, ज्यांनी पाकची झोप उडवली त्यांच्याकडून खुलासा

First published: February 26, 2019, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading