झाडाला लटकला होता प्रेमी युगलाचा मृतदेह, खून झाल्याचा संशय

झाडाला लटकला होता प्रेमी युगलाचा मृतदेह, खून झाल्याचा संशय

शवविच्छेदन रिपोर्टनुसार, प्रेमी युगलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

गोरखपूर(उत्तर प्रदेश)11 जून :  प्रेमाला आणि लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणांची आत्महत्या केल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात युवती आणि युवकाचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण प्रेमी युगलांची हत्या करण्यात आली की त्यांनी आत्महत्या केली याबद्दल अद्याप कोणताही माहिती देण्यात आली नाही.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील आंब्याच्या झाडाला तरुण आणि तरुणीचा मृतदेह लटकलेला होता. त्यानंतर या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदन रिपोर्टनुसार, प्रेमी युगलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर त्यांना झाडाला टांगण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाचा वेगळ्या पद्धतीने शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : दहावी परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिली चक्क आर्ची आणि परश्याची लव्हस्टोरी!

पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून तरुणी आणि तरुण एकमेकांना पसंत करत होते. पण तरुणीच्या घरच्यांनी तिचा विवाह कोणा दुसऱ्याची ठरवला होता. 25 जूनला तरुणीचा विवाह होणार होता. पण त्याआधीच तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

तरुणीचं प्रेम प्रकरण असल्यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. त्यासाठी गोरखपूर पोलीस मृतांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करणार असून या स्थानिक त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत

Tags: BJP
First Published: Jun 11, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading