S M L

कुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही

ड्रायव्हरनं कानात इयरफोन घातले होते. त्यामुळे त्याला ट्रेनच्या हाॅर्नचा आवाजच ऐकू आला नाही.

Sonali Deshpande | Updated On: Apr 26, 2018 01:38 PM IST

कुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही

उत्तर प्रदेश, 26 एप्रिल : कुशीनगर इथे स्कूलबसच्या अपघातात 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार ड्रायव्हर होता, हे निदर्शनास आलंय. ड्रायव्हरनं कानात इयरफोन घातले होते. त्यामुळे त्याला ट्रेनच्या हाॅर्नचा आवाजच ऐकू आला नाही.

स्कूल व्हॅन क्रॉसिंग करत असताना समोर येणाऱ्या रेल्वेची सूचना या गेटमननं गाडीचालकाला दिली होती. गेटमन आवाज देत होता. परंतु गाडीचालकानं कानात इयरफोन घातलेले असल्यानं त्याच्यापर्यंत गेटमनचा आवाज पोहोचलाच नाही. गाडीचालकाच्या हा बेजबाबदार कृत्यामुळे आपण 55075 ट्रेनच्या जवळ जातोय याचा अंदाजच आला नाही आणि बघता बघता ट्रेननं स्कूल व्हॅनला धडक दिली. आणि 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले. ही स्कूलबस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जात होती.

दरम्यान,  या अपघाताच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पीडितांच्या भेटीला गेले होते. तिथं त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शेकडो लोकांनी यावेळी आदित्यनाथ यांना  घेराव घातला. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या लोकांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 01:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close