रडू कोसळणं हे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे, 'लेडी सिंघम'चं स्पष्टीकरण

"रडू कोसळणं हे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे...माझे वरिष्ठ अधिकारी म्हणजे गोरखपूरचे एसपी गणेश साहा माझ्या बाजूनं उभे राहिले"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 8, 2017 04:53 PM IST

रडू कोसळणं हे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे, 'लेडी सिंघम'चं स्पष्टीकरण

08 मे : रडू कोसळणं हे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे...माझे वरिष्ठ अधिकारी म्हणजे गोरखपूरचे एसपी गणेश साहा माझ्या बाजूनं उभे राहिले, त्यांनी आमदारांसमोर माझी बाजू उचलून धरली हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले, असं असं स्पष्टीकरण सिंघम लेडी चारू निगम यांनी दिलं.

रडू कोसळणं म्हणजे वीक असणं नव्हे...महिला जास्त संवेदनशील असतात म्हणून मला रडू कोसळलं असंही त्या पुढे म्हणाल्या. याबद्दल त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकलीये. काल रविवारी गोरखपूरमध्ये एक आंदोलन सुरू होतं. अवैध दारूविक्रीच्याविरोधात आंदोलन करत होते. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या आशीवार्दाने अवैध दारुविक्री राजरोस चालते, असा या स्थानिकांचा आरोप होता. आंदोलनाच्या वेळेस तणाव निर्माण झाला. यावेळी काही महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी लाठीमार केला.

आंदोलकांनी आमच्यावर दगडफेक केल्यामुळे आम्हाला लाठीमार करावा लागला, असा दावा यावेळी पोलिसांनी केला. या घटनेची माहिती समजताच स्थानिक आमदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल याठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी तिथे बंदोबस्तावर तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी चारू निगम यांना झापलं.

चारू निगम या २०१३च्या आयपीएस  तुकडीच्या अधिकारी असून त्या सध्या उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेत आहेत. मी तुमच्याशी बोलतंच नाहीये, तुम्ही मला काही सांगूच नका. तुम्ही एकदम शांत बसा, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असं राधामोहन अग्रवाल बोलताना दिसत आहेत. त्यावर चारू निगम यांनीदेखील अग्रवाल यांना प्रत्युत्तर दिले. मी इथली प्रमुख अधिकारी आहे, मी काय करतेय हे मला माहिती आहे, असं निगम यांनी म्हटलं. हा सगळा प्रकार सुरू असतानाच चारू निगम यांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. यावेळी चारू यांना अक्षरश: आपले अश्रू अनावर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2017 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...