गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी डॉ. कफिल यांना अटक

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी बीआरडी मेडिकल कॉलेजचे डॉ. काफिल यांना अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे याच डॉक्टरांनी बालकांना ऑक्सीजन मिळवून देण्यासाठी धावपळ केल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2017 11:06 AM IST

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी डॉ. कफिल यांना अटक

गोरखपूर, 2 सप्टेंबर : गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी बीआरडी मेडिकल कॉलेजचे डॉ. काफिल यांना अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे याच डॉक्टरांनी बालकांना ऑक्सीजन मिळवून देण्यासाठी धावपळ केल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी पदरमोड करून मुलांना ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून काही मुलांचे प्राण वाचू शकले होते. पण तरीही उत्तरप्रदेश सरकारने गोरखपूर बाल मृत्यू प्रकरणी त्यांनाच जबाबदार धरत त्यांच्यावर अटकेची कारवाई केलीय. मुलांसाठी वेळेत ऑक्सीजन मिळवून देण्यात हलगर्जी पणाचा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे. तर त्यांच्या या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाकडे लाखो रुपयांचे बील थकल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या ७० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३५ पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेसाठी रुग्णालयाचे प्रमुख राजीव मिश्रा आणि मेंदूज्वर विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यांना विभागप्रमुख पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर ते गायब झाले होते. काल अखेर त्यांना अटक करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 11:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...