खळबळजनक! लव्ह ट्रायंगलमुळे भाजप नेत्याच्या मुलाची हत्या, मर्डरला दिलं अपघाताचं स्वरूप

खळबळजनक! लव्ह ट्रायंगलमुळे भाजप नेत्याच्या मुलाची हत्या, मर्डरला दिलं अपघाताचं स्वरूप

भाजप बूथ अध्यक्ष हिरालाल यांचा मुलगा राणा प्रताप बेलदार यांचा मृतदेह 16 ऑक्टोबर रोजी सकाळी सोनबरसा जंगलात सापडला.

  • Share this:

गोरखपूर, 18 ऑक्टोबर : महिलेशी अवैध संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर एका तरूणानं आपल्या दोन मित्रांसमवेत भाजपच्या बूथ अध्यक्षांच्या मुलाची हत्या केली. या घटनेनंतर 24 तासात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील आहे.

आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार, या हत्येची माहिती देताना एसपी उत्तर अरविंद कुमार पांडे म्हणाले की, भाजप बूथ अध्यक्ष हिरालाल यांचा मुलगा राणा प्रताप बेलदार यांचा मृतदेह 16 ऑक्टोबर रोजी सकाळी सोनबरसा जंगलात सापडला. एसपी म्हणाले की, अज्ञात इसमांनी राणा प्रताप बेलदार यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना ठार केले. या हत्येला अपघाताचे रुप देण्यासाठी आरोपींनी त्या युवकाची मोटारसायकल त्याच्या शरीरावर टाकली होती.

वाचा-भयंकर! TVमुळे भाऊ झाला वैरी! लहान बहिणीच्या डोक्यात घातला हातोडा

दरम्यान, आरोपींविरुद्ध कलम 302, 3(2)5 एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा प्रताप यांच्या हत्येप्रकरणी चौकशी आणि अन्य तथ्यांनंतर राकेश यादव, रामकेश यादव, पन्ने लाल यांची नावे समोर आली. पोलिसांनी तिघांना बेनीगंज येथून अटक केली.

वाचा-धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून झाला वाद; बेदम मारहाण करत महिलेची जीभच छाटली

तिघांची काटेकोरपणे चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितले की, रामकेश यादव यांचे एका महिलेबरोबर अवैध संबंध होते. राणा प्रतापही त्याच महिलेला भेटत असत. रामकेश यादवनं ताकिद देऊनही राणा प्रताप यांनी ऐकले नाही. रागात रामकेश आणि त्याच्या मित्रांनी मिळून राणा प्रताप यांची हत्या करण्याचा प्लॅन रचला.

Published by: Priyanka Gawde
First published: October 18, 2020, 1:00 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading