S M L

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू,योगींनी केलं सकाळी सात वाजताच मतदान

बिहारमध्येही झियानाबाद आणि भभुआ इथे विधानसभेच्या दोन जागांसाठी मतदान होतेय. राज्यात नितीशकुमार यांनी युती तोडल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे.

Sonali Deshpande | Updated On: Mar 11, 2018 10:45 AM IST

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू,योगींनी केलं सकाळी सात वाजताच मतदान

11 मार्च : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये आज लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आधी लोकसभेवर होते. पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना खासदारपदाचा राजीनामा द्यावा लागला. जागा रिकामी झाल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होतेय. एकूण 970 मतदान केंद्र आहेत, तर मतदारांची एकूण संख्या आहे 19 लाख 49 हजार.

उत्तर प्रदेशच्या फुलपूरमध्येही आज लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होतंय. या निवडणुकीत बसपानं सपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय. फुलपूरचे खासदार केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. एकूण 793 मतदान केंद्रांवर मतदान सुरू झालंय. मतदारांची संख्या 19 लाख 61 हजार एवढी आहे.

बिहारमध्येही झियानाबाद आणि भभुआ इथे विधानसभेच्या दोन जागांसाठी मतदान होतेय. राज्यात नितीशकुमार यांनी युती तोडल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 10:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close