मुंबईच्या सबिना कर्णिकने तयार केलं स्वातंत्र्यदिनासाठी गुगलचं हे डुडल

मुंबईच्या सबिना कर्णिकने तयार केलं स्वातंत्र्यदिनासाठी गुगलचं हे डुडल

या डुडलमध्ये भारताची संसद दिसते आहे. संसद ही स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून दाखवण्यात आली आहे

  • Share this:

15 ऑगस्ट: भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुगलने एक स्पेशल डुडल तयार केलं आहे. हे डुडल गुगलमध्ये काम करणाऱ्या सबिना कर्णिक या मुंबईच्या मुलीने तयार केलंय.

या डुडलमध्ये भारताची संसद दिसते आहे. संसद ही स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून दाखवण्यात आली आहे. ही संसद एका प्रतिकात्मक चाकावर पुढे जाते आहे. हे चाक दुसरं तिसरं काही नसून भारताच्या तिरंग्यातील अशोक चक्र आहे. आणि या चक्राच्या दोन्ही बाजूला दोन मोर आहेत. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. संसद भवनावरती 'गुगल'ही मोठ्या खूबीने लिहिलेलं दिसतंय. कारण हे 'गुगल' भारताच्या तिरंग्यातील केशरी हिरव्या आणि पांढऱ्या या तीन रंगात लिहिलं आहे. असं सब्रिनाने तयार केलेलं हे डुडल हे सध्या प्रचंड गाजतं आहे.

या आधीही गुगलने स्वातंत्र्यदिनानिमित्त काही डुडल ठेवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2017 11:53 AM IST

ताज्या बातम्या