गुगलचं आलं 'तेज' अॅप, मिळवू शकतात 9 हजार रुपये !

गुगलचं आलं 'तेज' अॅप, मिळवू शकतात 9 हजार रुपये !

गुगलने आपला UPI बेस्ट पेमेंट अॅप TEZ लाँच केलाय. तुर्तास हा अॅप अँड्राईड वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे.

  • Share this:

18 सप्टेंबर : गुगलने आपला UPI बेस्ट पेमेंट अॅप TEZ लाँच केलाय. तुर्तास हा अॅप अँड्राईड वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे. NPCI चा UPI ही अशी सिस्टिम आहे त्यावर ग्राहकांना एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहज पैसे पाठवता येतात.

ज्या लोकांच्या फोन मध्ये  UPI अॅप आहे. त्यांनी फक्त आपला फोन क्रमांक वापरून बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू शकतात. यासाठी वापरकर्त्याला आपल्या बँक अकाऊंट नंबर, IFSC कोडची माहिती द्यावी लागते.

गुगलनेही UPI बेस पेमेंट सिस्टिममध्ये  पाऊल टाकत TEZ अॅप लाँच केलं. तेज अॅपमध्ये तुम्ही फोनमधील काॅन्टेक्ट यादीचा वापर करू शकतात. त्यामुळे व्यवहार करण्यास अधिक सोपं होईल.

अशी आहे आॅफर

लाँच केल्यानंतर गुगलने खास आॅफर दिल्या आहेत. जर तुम्ही तेज अॅप मित्रांना डाऊनलोड करण्यास आव्हान केलं तर तुमच्या खात्यात 51 रुपये जमा होतील. यामध्ये हव्या तितक्या लोकांना आवाहन करू शकतात. यामुळे तुम्ही अधिकाधिक 9 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करू शकतात. ही आॅफर फक्त 1 एप्रिल 2018 पर्यंत उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही पहिल्या 50 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट ट्रान्सफर केलं तर तुम्हाला स्क्रॅच कार्ड दिले जाईल ज्यामद्ये तुम्हाला लकी ड्रामध्ये 1 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 10:02 PM IST

ताज्या बातम्या