गुगलची आणखी एक सेवा लवकरच बंद होणार

गुगलची आणखी एक सेवा लवकरच बंद होणार

Google Play Artist Hub अ‍ॅप्लिकेश लवकरच बंद होणार? काय आहेत यामागची कारणं?

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल: Google Plus आणि Inbox by Gmail या सेवा गुगलने बंद केल्यानंतर आता गुगलची अजून एक सेवा लवकरच बंद होणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणारं Google Play Artist Hub ज्यावरून आपण आपल्या आवडत्या गीतकार, संगीतकाराची गाणी आवडीनं ऐकत असतो. ते अ‍ॅप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.


30 एप्रिलपर्यंत ही सेवा सर्व फोनमध्ये सुरू असेल मात्र 30 एप्रिलनंतर नवीन युझर्सना या अ‍ॅप्लिकेशनवर लॉगईन करता येणार नाही.  2012 रोजी गुगलने हे अ‍ॅप्लिकेशन लॉन्च केलं होतं. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये कलाकार आपली गाणी अपलोड करू शकत होते. हे अ‍ॅप्लिकेशन सबस्क्राइब केल्यानंतर आपल्याला हवी ती गाणी आपण ऐकू शकत होतो. याशिवय इंटरनेट नसेल तरीही तुमच्या फोनमधील गाणी तुम्ही या अ‍ॅप्लिकेशनद्वारे ऐकू शकत होता. मात्र हा पर्याय बंद होणार असल्याने चाहत्यांचा हिरमोड होणार आहे. जे युझर्स हे अ‍ॅप्लिकेशन वापरतात त्यांना फक्त 30 एप्रिलपर्यंतच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यांतर या अ‍ॅप्लिकेशनवर कोणत्याही प्रकारे गाणी, ऑडिओ, व्हिडिओ अपलोड करता येणार नाहीत. नवीन युझर्सनाही या सेवेचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती गुगलने नुकतीच दिली आहे.


Google Play Artist Hub या अ‍ॅप्लिकेशनवर ज्या कलाकारांनी आपले व्हिडिओ, किंवा गाणी अपलोड केली आहेत त्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत फायनल रिपोर्ट आणि पैसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर 1 जुलैपासून हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोरवरूनही हटविण्यात येणार असल्याची माहिती आहे. Youtube Music मुळे ही सेवा गुगल बंद करणार असल्याचा अंदाज आहे. Youtube Music सेवेवर गुगलला अधिक लक्ष केंद्रीत करायचं आहे. त्यामुळे आता तुमच्या फोनमधली Google Play Artist Hub ची जागा Youtube Music घेणार आहे. याआधी गुगलने Google, Allo, Inbox by Gmail या सेवा बंद केल्या आहेत. आगामी काळातही गुगल अजून कोणती नवीन सेवा युझर्ससाठी आणते ते पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.


 


VIDEO: 'मोदी पंतप्रधान नाही झाले तर निदान खासदार तरी होतील'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या