मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? Google नं दिलेल्या उत्तरामुळे गोंधळ, मागावी लागली माफी

भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? Google नं दिलेल्या उत्तरामुळे गोंधळ, मागावी लागली माफी

गूगलवर (Google) भारतातील सर्वात खराब भाषा कोणती (Most Vulgar Language In India) असा सवाल केला असता कन्नड (Kannada) हे उत्तर आल्यानं गुरुवारी कर्नाटकात (Karnataka) एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

गूगलवर (Google) भारतातील सर्वात खराब भाषा कोणती (Most Vulgar Language In India) असा सवाल केला असता कन्नड (Kannada) हे उत्तर आल्यानं गुरुवारी कर्नाटकात (Karnataka) एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

गूगलवर (Google) भारतातील सर्वात खराब भाषा कोणती (Most Vulgar Language In India) असा सवाल केला असता कन्नड (Kannada) हे उत्तर आल्यानं गुरुवारी कर्नाटकात (Karnataka) एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

बेंगळुरु 04 जून : गूगलवर (Google) भारतातील सर्वात खराब भाषा कोणती (Most Vulgar Language In India) असा सवाल केला असता कन्नड (Kannada) हे उत्तर आल्यानं गुरुवारी कर्नाटकात (Karnataka) एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. लोक सोशल मीडियावर याबाबत चर्चा करू लागले. ही बाब इतकी गंभीर झाली, की राज्य सरकारनं थेट गूगलला कायदेशीर नोटीस पाठवली. याशिवाय सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आणि गूगलवर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर भारतातील सर्वात खराब भाषा कोणती हा सवाल विचारल्यानंतर येणारं कन्नड हे उत्तर गूगलवरुन हटवण्यात आलं. गूगलनं याबाबत माफी मागत असं म्हटलं, की सर्चच्या परिणामांमध्ये त्यांचं मत नसतं.

कर्नाटकचे कन्नड, संस्कृति आणि वनमंत्री अरविंद लिंबावली यांनी बातचीत करताना म्हटलं, की या उत्तरासाठी गूगलला कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. यानंतर त्यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आणि कर्नाटकच्या लोकांची माफी मागण्याचं आवाहन गूगलला केलं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की कन्नड भाषेचा स्वतःचा एक इतिहास आहे आणि जवळपास 2,500 वर्षाआधी ही भाषा अस्तित्वात आली. मंत्री म्हणाले, की ही भाषा गेल्या अनेक काळापासून कन्नड लोकांचा गौरव आहे.

Explainer: सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही पाळावी लागणार बंधनं; काय आहे नियम

पुढे ते म्हणाले, कन्नड भाषा खराब असल्याचं दाखवणं हा कर्नाटकातील लोकांच्या गौरवाचा अपमान करणं आहे. त्यामुळे, याप्रकरणी गूगलनं तात्काळ माफी मागावी. आमच्या सुंदर भाषेची प्रतिमा खराब करण्यासाठी गूगलवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

याबाबत गूगलच्या प्रवक्त्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं, की सर्च नेहमीच पूर्णपणे परिपूर्ण नसतं. अनेकदा इथे काही गोष्टी सर्च केल्यास अपेक्षित नसणारी उत्तर समोर येतात. हे योग्य नाही याची कल्पना आम्हाला आहे, मात्र अशी चूक लक्षात येताच आम्ही त्यात दुरुस्ती करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यात गूगलचं स्वतःच मत नसतं. मात्र, या गैरसमजासाठी आणि लोकांच्या भावना दुखावल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असंही त्यांनी म्हटलं.

First published:
top videos

    Tags: Google, Karnataka