News18 Lokmat

तुमच्या फोनमध्ये डेटा चोरणारं अ‍ॅप तर नाहीत ना? गुगलनं 'डेटाथेफ्ट' रोखण्यासाठी उचललं हे मोठं पाऊल

आपल्या फोनमध्ये आपण खूप अ‍ॅप्लिकेशन सतत डाऊनलोड करत असतो. त्यातली किती अ‍ॅप्लिकेशन सुरक्षित आहेत याचा विचार आपण खरंच करतो का? आता गुगलनंच काही अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकली आहेत. त्यामुळे सावधान!

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 06:37 PM IST

तुमच्या फोनमध्ये डेटा चोरणारं अ‍ॅप तर नाहीत ना? गुगलनं 'डेटाथेफ्ट' रोखण्यासाठी उचललं हे मोठं पाऊल

मुंबई, 2 एप्रिल : सध्या डेटा चोरून माहितीचा गैरवापर करण्याचं प्रमाण वाढलं असताना गुगलने याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. गुगलने अ‍ॅण्ड्रॉईड युजर्ससाठी धोकादायक असलेली 200 अ‍ॅप्स आपल्या प्ले स्टोरमधून हटवली आहेत. प्ले स्टोरमधून हे 200 अ‍ॅप्लिकेशन्स जवळपास 15 कोटींपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड करण्यात आली असल्याची माहिती गुगलने दिली. एका अहवालानुसार या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर स्मार्टफोनमधील युजर्सची माहिती घेऊन ती दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सना देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे गुगुलने प्ले स्टोरवरून अशी 200 अ‍ॅप्लिकेशन्स हटवली आहेत.


कुठली अॅप्स हटवली

फोन फाइंडर (Phone Finder)

ड्युअल स्क्रीन ब्राऊझर (Dual Screen Browser)

Loading...

फेस ब्युटी मेकअप (Face Beauty Makeup)

डिलिटेड फाईल्स रिकव्हरी (Deleted Files recovery)

ब्रोकन स्क्रीन- (Broken Screen – Cracked Screen)

मोदी फोटो फ्रेम- (Modi Photo Frame)

अ‍ॅन्टी थेफ्ट अ‍ॅण्ड फुल बॅटरी अलार्म- (Anti Theft & Full Battery Alarm)

वॉईस रीडिंग फॉर SMS, वॉट्सअ‍ॅप अ‍ॅण्ड टेक्स्ट (SMS- Voice reading for SMS. Whatsapp & text sms)

मूव्ह अ‍ॅप टू SD कार्ड- (Move App To SD Card)

लाइव ट्रान्सलेटर- (Live Translator)

फ्लॅश अलर्ट- (Flash Alert – Flash on Call)

फुटबॉल रिजल्ट अ‍ॅण्ड स्टेट्स अ‍ॅनालाइझर- (Football Results & Stats Analyzer)

DSLR कॅमेरा ब्लर- (DSLR Camera Blur)

रिकवर डिलिटेड पिक्चर्स- (Recover Deleted Pictures)

अ‍ॅन्टी स्पॅम कॉल्स- (Anti-spam Calls)

प्रोफेशनल रेकॉर्डर - (Professional Recorder)


यापैकी किंवा अशा प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये असेल तर ते तुमच्या फोनमधून हटवण्याचं आवाहन गुगलकडून करण्यात आलं आहे. तुमच्या फोनमधील डेटा अज्ञान लोकांच्या किंवा अशा पद्धतीच्या अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे काढून तो विकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तुम्ही कुठलंही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केलं की, टर्म आणि कंडिशन्स न वाचता सरळ ओके करून तुमचा डेटा अ‍ॅपवर अपलोड करत असता. यामध्ये गेम्स, फोटो एडिटींगसारखे अ‍ॅप्लिकेशन्स आहेत जे तुमच्या फोनमध्ये कायम असतात. त्यांना तुम्ही नकळत तुमची माहिती देत असता. मात्र गुगलनं सर्व युझर्सना अशी अ‍ॅप्लिकेशन न वापरण्याचं आवाहन केलं आहे. गुगलने प्ले स्टोरवरून अशी 200 अ‍ॅप्लिकेशन्स हटवली आहेत. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये असं कुठलं अ‍ॅप्लिकेशन नाही ना हे पाहा आणि असल्यास तात्काळ फोनमधून डीलिट करा.


VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...