Home /News /national /

Google Mapsने केरळच्या समुद्रात टिपलं एक बेट; पण असं बेटच नाही? जाणून घ्या काय आहे गौडबंगाल

Google Mapsने केरळच्या समुद्रात टिपलं एक बेट; पण असं बेटच नाही? जाणून घ्या काय आहे गौडबंगाल

गुगल मॅप्सने एक नवं बेट शोधलं आहे हे बेट पश्चिम कोचीच्या निम्म्या आकारा इतकं असल्याचं बोललं जात आहे.

    केरळ, 17 जून: केरळ (Off Kerala Coast) राज्याच्या किनाऱ्यापलीकडच्या समुद्रात किडनीच्या आकाराचं एक छोटं बेट (Kidney Shaped Island) असल्याचं गुगल मॅप्समध्ये दर्शविण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मात्र ते बेट कधीही कुणालाही दिसलेलं नाही. गुगल मॅप्सच्या सॅटेलाइट इमेजरीमध्ये (Google Maps Satellite Imagery) टिपलं गेलेलं हे बेट पश्चिम कोचीच्या (Western Coachi) निम्म्या आकाराएवढं आहे, असं वृत्त 'न्यूज मिनिट'ने दिलं आहे. प्रत्यक्षात समुद्रात असं बेट अस्तित्वात नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे तज्ज्ञांसह अनेकांना बुचकळ्यात टाकलं आहे. काही जणांचा असा तर्क आहे, की ते बेट कदाचित समुद्रात बुडालेल्या स्थितीत असावं. चेल्लानम कर्शिका टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने (Chellanam Karshika Tourism Development Society) हा मुद्दा सर्वांत प्रथम उपस्थित केला होता. 'केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज' (Kerala University of Fisheries & Ocean Studies) या संस्थेच्या अधिकाऱ्यांना या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल पत्र लिहिलं. 'केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज' ही संस्था किनारपट्टीच्या भागात होत असलेल्या धुपीबद्दल संशोधन करत असून, आता या नव्या बेटाबद्दलही ती संशोधन करत आहे. चेल्लानम कर्शिका संस्थेचे अध्यक्ष झेवियर जालुप्पन यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे, की या छोट्या बेटाच्या निर्मितीमागची कारणं, सागरी प्रवाहातली त्याची भूमिका आणि या वाळूपासून चेल्लानम पंचायतीची आर्टिफिशियल कोस्टल नरिशमेंट आदी मुद्द्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुंभमेळ्यात हजारो खोट्या कोविड टेस्ट; एका घटनेमुळे समोर आली धक्कादायक माहिती, चौकशी सुरू या बेटाची निर्मिती नेमकी कशी झाली असावी, याचा वेध घेणं आवश्यक आहे. तसंच, पाण्याच्या लाटा आणि प्रवाह, तसंच सागरी भागात होणारी धूप यांमध्ये याची काय भूमिका आहे तेही पाहावं लागेल. चेल्लानमच्या किनारी भागाच्या कृत्रिम संवर्धनासाठी त्याचा काय उपयोग करून घेता येईल, हेदेखील पाहण्याची गरज झेवियर यांनी केरळ युनिव्हर्सिटीला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. 'द न्यूज मिनिट'च्या वृत्तानुसार, गुगल मॅप्स सॅटेलाइट इमेजरीने टिपेपर्यंत या पाण्याखालच्या बेटाबद्दल (Underwater Island) आतापर्यंत काहीही ज्ञात नव्हतं. जेव्हा ते बेट प्रत्यक्षात सापडेल, तेव्हा त्याचे घटक आणि त्याच्या निर्मितीला कारणीभूत असलेले घटक आदींचा अभ्यास केला जाईल, असं त्या वृत्तात म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: India, Kerala

    पुढील बातम्या