गुगलही रंगलंय प्रेमरंगात; गुगल डुडल झालंय प्रेमाचं प्रतिक

गुगलही रंगलंय प्रेमरंगात; गुगल डुडल झालंय प्रेमाचं प्रतिक

गुगलही या प्रेमाच्या उत्सवात मागे नाहीये. गुगलनंही डूडलच्या माध्यमातून प्रेमाच्या या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

14 फेब्रुवारी : आज व्हेलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. आजच्या दिवशी तरुणाई आपलं प्रेम व्यक्त करत असते. गुगलही या प्रेमाच्या उत्सवात मागे नाहीये. गुगलनंही डूडलच्या माध्यमातून प्रेमाच्या या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आजच्या व्हेलेंटाईन डे दिवशी प्रेमाची देवाणघेवाण होते असं म्हणायला हरकत नाही. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आज प्रेत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात गुगलनंही उडी मारलेय.

आज व्हॅलेंटाईन डे आणि त्यात सध्या विंटर ऑलंपिक सुरू आहे. या दोघांना एकत्र करून गुगल आजचं डुडल तयार केलं आहे. बाहेरची गुलाबी थंडी आणि त्यात प्रेमाचा वर्षाव...तसंच गुगलनंही केलं आहे. एक छान म्यूझिक आणि त्यात दोन पक्षांचा एकत्रित डांन्स असा एक व्हिडिओ तयार करून गुगलनं सर्वांना व्हेलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आजच्या दिवशी प्रेमाच्या त्या सर्व रोमँटीक गाण्यांना आणि प्रेमाच्या कवितांना उधाण येतं. त्यामुळे आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या न्यूज 18 लोकतमकडून सर्वांना शुभेच्छा!

First published: February 14, 2018, 9:57 AM IST

ताज्या बातम्या