S M L

पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी रखमाबाई राऊत यांचा गुगलनं डूडल करून केला सन्मान

आज त्यांची 153वी जयंती आहे, त्यामुळे गुगलने त्यांचं डूडल बनवून त्यांचा सन्मानित केलं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 22, 2017 04:29 PM IST

पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी रखमाबाई राऊत यांचा गुगलनं डूडल करून केला सन्मान

22 नोव्हेंबर : आज गुगल उघडल्यावर तुम्हाला एका महिलेचा स्टथोस्कोप घेऊन फोटो दिसेल. त्या महिला आहेत रखमाबाई राऊत. रखमाबाई राऊत या भारतातील पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी  होत्या. आज त्यांची 153वी जयंती आहे, त्यामुळे गुगलने त्यांचं डूडल बनवून त्यांचा सन्मानित केलं आहे.

रखमाबाईंचा जन्म जनार्दन पांडुरंग आणि जयंतीबाई यांच्या घरी झाला. जनार्दन पांडुरंग यांच्या मृत्यूनंतर जयंतीबाईंनी त्यांची सगळी संपत्ती रखमाबाई यांच्या नावावर केली. तेव्हा त्या फक्त 7 वर्षांच्या होत्या. जेव्हा त्या 11 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांचं लग्न दादाजी भिकाजी यांच्यासोबत लावून दिलं.

लग्नानंतरही त्या त्यांच्या विधवा आई जयंतीबाई यांच्या घरातच राहिल्या. जेव्हा दादाजी आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना सासरी चलण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला.  त्यांच्या या निर्णयास अनेकांनी विरोध केला पण त्यांच्या सावत्र वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला. अगदी लहान वयातच त्यांचं लग्न झालं पण तरीही त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर बनल्या.

बालवधूपासून ते पहिली महिला डॉक्टर असा 'त्यांचा' प्रवास  

Loading...
Loading...

लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन या शाळेतून शिक्षण घेण्यासाठी रखमाबाई 1889मध्ये इंग्लंडला गेल्या. या सगळ्यासाठी रखमाबाई यांना मताधिकाराचे कार्यकर्ता एवा मॅक्लरेन आणि वॉल्टर मॅक्लरेन यांनी त्यांना मदत केली. त्याचबरोबर महिलांना वैद्यकीय मदत करणाऱ्या डेफरिनच्या निधीतूनही त्यांना खूप मदत झाली.

शिक्षणानंतर सूरतच्या हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी त्या 1894मध्ये भारतात परतल्या. 1904मध्ये त्यांचे पती भिकाजी यांचा मृत्यू झाला.

1918 मध्ये रखमाबाई यांनी महिला वैद्यकीय सेवेमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव नाकारला आणि राजकोटमध्ये महिलांसाठीच्या एका  हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला.

रखमाबाईंनी 35 वर्ष मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. रखमाबाई राऊत यांच्या कारकिर्दीला सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 04:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close