भारताच्या पहिल्या महिला वकील काॅर्नेलिया यांचं गुगल डूडल

आज 15 नोव्हेंबर आहे आणि आजच्या दिवसाचंही खास महत्त्व आहे. आजच्या दिवशी भारताची पहिली महिला वकील 'कॉर्नेलिया सोरबाजी' यांचा जन्म झाला होता. त्यांच्या या 151व्या स्मृतीदिनानिमित्त गुगलकडून त्यांना सन्मान दिला गेला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 12:29 PM IST

भारताच्या पहिल्या महिला वकील काॅर्नेलिया यांचं गुगल डूडल

15 नोव्हेंबर : आजच्या दिवशी काय आहे असा प्रश्न पडला तर बऱ्याच वेळा आपल्याला गुगल मदत करतं. प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगण्यासाठी गुगल आपले लोगो बदलत असतं. आज 15 नोव्हेंबर आहे आणि आजच्या दिवसाचंही खास महत्त्व आहे. आजच्या दिवशी भारताची पहिली महिला वकील 'कॉर्नेलिया सोरबाजी' यांचा जन्म झाला होता. त्यांच्या या 151व्या स्मृतीदिनानिमित्त गुगलकडून त्यांना सन्मान दिला गेला आहे. आज गुगलने त्यांच्या नावाचं डूडल बनवलं आहे.

मुंबई विद्यापिठातुन पदवी घेणाऱ्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या कॉर्नेलिया पहिल्या भारतीय महिला आहेत.गुगलने काढलेल्या या डूडल चित्रामध्ये त्या पहिली महिला वकिल म्हणून अलाहाबादच्या उच्च न्यायालयासमोर उभ्या आहेत.

कॉर्नेलिया यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात वकिलीचं शिक्षण घेतलं, पण महिला असल्या कारणाने त्यांना पदवी मिळाली नाही. त्यामुळे त्या परत भारतात आल्या.भारतातही त्यांच्या वकिलीला लोकांचा आक्षेप होताच पण तरीही त्या त्यांच्या ध्येयापासून मुकल्या नाहीत. कठीण परिश्रम आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्या कायदेशीर सल्लागार बनल्या.

या पदवीच्या जोरावर त्यांनी सतत समाज प्रबोधनाचं काम केलं. कॉर्नेलिया महिलांच्या अधिकासाठी सतत लढत राहिल्या. त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्या नेहमी पुढे होत्या.विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत हक्क मिळवून देण्यात त्या यशस्वीही झाल्या.

Loading...

समाजातील अडथळ्यांना आपल्या यशाची पायरी बनवत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 'कॉर्नेलिया सोरबाजी' यांना आमचा सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...