युरोपियन युनियनचा 'गुगल'ला दणका, 1.49 अब्ज युरोचा दंड!

युरोपियन युनियनचा 'गुगल'ला दणका, 1.49 अब्ज युरोचा दंड!

ऑनलाईन जाहिरातीत पक्षपात केल्याप्रकरणी युरोपियन आयोगाने सर्च इंजिनमधील आघाडीच्या गुगलला जोरदार झटका दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च: ऑनलाईन जाहिरातीत पक्षपात केल्याप्रकरणी युरोपियन आयोगाने सर्च इंजिनमधील आघाडीच्या गुगलला जोरदार झटका दिला आहे. युरोपियन आयोगाने स्पर्धात्मक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत गुगलला 1.49 अब्ज युरो म्हणजेच 117 अब्ज रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलला दंड करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआदी जुलै महिन्यात आयोगाने याच प्रकरणी 344 अब्ज रुपयांचा दंड केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवल एखाद्या कंपनीला करण्यात आलेला हा सर्वात मोठा दंड आहे.

2017नंतर गुगलला अशा प्रकारे झालेला हा तिसरा मोठा दंड आहे. जाहिरातीत पक्षपात केल्याचा आरोप नेहमीच केला जातो. युरोपियन संघाकडून गुगल, अमेझॉन, अॅपल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांवर नजर ठेवत असतो.

काय आहे आक्षेप

अँड्राइड डिव्हाईसवर सर्च इंजिन आणि ब्राऊझरचा गुगलकडून चुकीचा वापर होत असल्याचा गुगलवर आरोप आहे. एखाद्या उत्पादनाचा शोध घेताना गुगल जाहिरातम्हणून स्वत:ची उत्पादने दाखवतो, असा आरोप गुगलवर आहे. विशेष म्हणजे गुगल अँड्राइड फोन उत्पादक कंपन्यांना अँड्राइड यंत्रणा मोफत देते. त्याच्या बदल्यात मोबाईल कंपन्यांना गुगल क्रोमसह अन्य गुगलचे अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करण्याची सक्ती करते. याबाबत एप्रिल 2015मध्ये गुगलच्या विरोधात फेअरसर्स या कंपनीने युरोपियन संघाकडे तक्रार केली होती. गुगल स्वत:च्या अॅपच्या माध्यमातून अँड्राइड स्मार्टफोनवर नियंत्रण ठेवत असल्याचे फेअरसर्स या कंपनीने तक्रारीत म्हटले होते.

VIDEO : रणजित तर आले विजयसिंह मोहितेंचं काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

First published: March 20, 2019, 8:51 PM IST

ताज्या बातम्या