Google's 21st Birthday: गुगलच्या 21व्या वाढदिवसानिमित्तानं जाणून घ्या 'या' खास गोष्टी

Google's 21st Birthday: गुगलच्या 21व्या वाढदिवसानिमित्तानं जाणून घ्या 'या' खास गोष्टी

Happy Birthday Google: वाढदिवसानिमित्तानं गुगलने स्वत:साठी तयार केलं 'हे' खास डुडल.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर: लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा खास मित्र असणाऱ्या गुगलचा आज 21 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं खास गुगलने स्वत: साठी 21th birthday असं डुडल तयार केलं आहे. जगातील प्रसिद्ध व्यक्तीच्या वाढदिवस, स्मृतीदिन, सण समारंभ किंवा मोठ्या घटनांचं डुडल गुगलकडून साकरालं जातं. खोका म्हणून त्या काळी ओळखला जाणाऱ्या संगणकावर 27 सप्टेंबर 1998 रोजी गुगलने पहिलं डुडल सुरू केलं होतं.गुगलने त्यावेळी स्वत:चा लोगो वापरून तारखेसह हे डुडल तयार केलं होतं.

या डुडलमध्ये जुना संगणक दाखवण्यात आला आहे. या संगणकावर गुगलचा जुना लोगो असणारं डुडल आणि 98 9 27 अशी तारीखही खाली उजव्या कोपऱ्यात दिसत आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी एक नवं सर्च इंजिन 1998 रोजी सुरू केलं होतं. या माध्यमातून जगभरातील सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा त्यामागचा हेतू होता. आता गुगल एकूण 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये 190 देशांमध्ये उपलब्ध आहे. भारतात याहू, मोझिलापेक्षा गुगलचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुगलवर तुम्हाला कधीही कोणतीही कुठलीही केव्हाही माहिती उपलब्ध होत असते. त्यामुळे गुगल हा आजच्या तरुणाईचा गुरू असंही म्हटलं जातं.

तुम्हाला माहीत आहे का गुगलचं स्पेलिंग 10100 बायनरी कोडींगप्रमाणे तयार करण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे याचं आणि 10100 ही संख्या लार्ज स्केल सर्च इंजिन ही संज्ञा आणि उद्देश साध्य करते. गुगल शब्दाला ऑक्सफोर्ड डिक्शनरीतही समाविष्ट करण्यात आलं आहे.

गुगल मॅप, गुगल व्हिडिओ कॉलिंग, माहितीचं भंडार यासोबत इतर नवनवीन फिचर्स गुगल लोकांसाठी आणत असतं. वापरण्यासाठी सगळ्यात सोप आणि सगळ्यात लोकप्रिय म्हणून google.com ही वेबसाईट असल्याचं Alexaचं म्हणणं आहे. Alexa एक कमर्शियल वेब ट्रॅफिक मॉनिटर करणारी कंपनी आहे.

SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

Published by: Kranti Kanetkar
First published: September 27, 2019, 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading