गुगलनं डूडल करून समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांना वाहिली आदरांजली

गुगलनं डूडल करून समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांना वाहिली आदरांजली

थोर स्‍वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांची आज ११५ वी जयंती आहे. ३ एप्रिल, १९०३ रोजी मंगलोर इथं जन्‍मलेल्या कमलादेवी यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानासाठी ओळखण्यात येतं.

  • Share this:

03 फेब्रुवारी : गुगल आपल्या डूडलद्वारे नेहमीच दिग्गजांच्या कार्याचा गौरव करत असतं. त्याचप्रमाणे आज गुगलनं कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यावर एक खास डूडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये चट्टोपाध्याय यांनी केलेल्या कार्याची झलक पाहायला मिळतेय.

थोर स्‍वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांची आज ११५ वी जयंती आहे. ३ एप्रिल, १९०३ रोजी मंगलोर इथं जन्‍मलेल्या कमलादेवी यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानासाठी ओळखण्यात येतं.

त्या बाल विधवा होत्या. त्यांनी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये 'बेडफर्ड कॉलेज' आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' इथे झाले. त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा धडाडीने भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

First published: April 3, 2018, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading