खूशखबर! 2.69 रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल, डिझेलचेही दर घसरले; हे आहेत नवे रेट

खूशखबर! 2.69 रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल, डिझेलचेही दर घसरले; हे आहेत नवे रेट

सध्या जगात सुरू असलेल्या Oil Price War मुळे भारतीयांना फायदा होऊ शकतो

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या असून आता याचा फायदा सर्वसामान्य भारतीयांना मिळत आहे. भारतात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण नोंदली गेली आहे. (Today Petrol Diesel Price) आज पेट्रोलची किंमत 2. 69 रुपयांनी कमी होऊन 70.20 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे, तर डिझेलची किंमत 2.33 रुपयांनी घसरून 63.01 रुपये झाली आहे.

सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात तेलाच्या किंमतीच्या युद्धामुळे (Oil Price War) आंतरराष्ट्रीय वायदा बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती 31 टक्क्यांनी खाली आले आहे. यामुळे भारतीयांना आर्थिक फायदा होऊ शकतो. कारण आपल्या देशातील पेट्रोलियम इंधन बऱ्याच अंशी आयातवर अवलंबून आहे.

संबंधित - वाहनधारकांसाठी मोठी खूशखबर! पेट्रोल प्रतिलीटर 50 रुपये दराने मिळणार

भारत आपल्या गरजेच्या 84 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने देशाचे आयात केले जाणाऱ्या तेलाचे बिल कमी होईल आणि किरकोळ किंमतीही कमी होतील.

आयात बिलावर 2,729 कोटींचा फरक

विविध क्षेत्रासाठी कमी खर्चामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला थोडा आधार मिळेल. यामुळे बर्‍याच भागात कच्च्या मालाची किंमत कमी होईल. बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेल्या किंमती अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत सोमवारी प्रति लिटर 70.20 रुपयांवर पोचली आहे.

संबंधित - आज पुन्हा स्वस्त झालं पेट्रोल; कुठे बघाल ताजे दर?

First published: March 11, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading