आनंदाची बातमी, खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

आनंदाची बातमी, खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल

  • Share this:

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : केंद्राकडून नोकरदार वर्गासाठी आणि त्यातही खासगी कंपन्यांमध्य़े काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफ बरोबरच कर्मचाऱ्यांना  पेंशन स्किम (Pension Scheme in India) घेणे अनिवार्य करण्यात येणार आहे. म्हणजेच EPF प्रमाणेच लवकरच पेंशन स्किमअंतर्गत देखील प्रत्येक महिन्याला पगारातून पैसे कापले जातील. किती पैसे कापले जावे, याचा निर्णय कर्मचारी स्वत: घेऊ शकेल. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. अर्थविभागाचे सचिव राजीव कुमार (Finance Secretary of India) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात एक संरचना तयार करण्यात येणार असून यासाहाय्याने कर्मचारी कमीत कमी 100 रुपये पेंशन स्किममध्ये घेऊ शकतील. याबरोबरच इतकीच रक्कम कंपनी आपल्यातर्फे खात्यात देऊ शकते. म्हातारपणात निवृत्ती वेतन मिळणं खूप आवश्यक आहे. याच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देता येईल.

PF बरोबर कापले जाणारे पैसे कधी मिळतात

-नोकरदार वर्ग PF अकाऊंटबाबत नेहमी त्रस्त असतो. अधिकतर खासगी कंपन्यांमधील लोक ईपीएफसह मिळणाऱ्या पेंशनबाबत सजग नसतो. नोकरदार वर्गाचा पगाट कापल्यानंतर दोन खात्यांमध्ये जाते. पहिला प्रोविडेंट फंड आणि दुसरा पेंशन फंड. कर्मचाऱ्याच्या पगारातून कापले जाणारे पैसे 12 टक्के कर्मचारी ईपीएफमध्ये जमा होतो. याव्यतिरिक्त कंपनीकडून 3.67 टक्के EPF मध्ये जमा होतो. आणि बाकी 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेंशन योजनेअंतर्गत जमा होतो. PF खात्यातील रक्कम कोणताही कर्मचारी एका वेळेनंतर काढू शकतो. मात्र पेंशनची रक्कम काढण्यासाठीचे नियम कठीण आहेत. मात्र जर तुमची नोकरी 6 महिन्यांपेक्षा जास्त वा 9 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी असेल तर फॉर्म 19 आणि 10c जमा करुन पीएफ रक्कमेबरोबरच पेंशनची रक्कमदेखील काढता येऊ शकते. मात्र यासाठी तुमचा मैनुअलच्या पद्धतीनुसार कार्यालयात आवेदन करणे गरजेचे आहे.

First published: February 3, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या