Home /News /national /

GOOD NEWS! आजोबा मुकेश अंबानीचा नातवासोबतचा पहिला खास फोटो

GOOD NEWS! आजोबा मुकेश अंबानीचा नातवासोबतचा पहिला खास फोटो

गेल्या वर्षी मार्चमध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं धूमधडाक्यात लग्न झालं होतं. आता त्यांच्या घरी पाळणा हलला आहे

    मुंबई, 10 डिसेंबर : देशातील टॉपचे व्यावसायिक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांची सून आणि आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. आता त्या छोट्या पाहुण्याचा आजोबांसोबतचा पहिला फोटो समोर आला आहे. आजोबा मुकेश अंबानी यांनी नातवासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा खास फोटो राज्यसभा सदस्य आणि उद्योगपती परिमल नाथवाणी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना परिमल नाथवाणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. नवीन सदस्याच्या आगमनासाठी मी मुकेश भाई, नीता भाभी आणि संपूर्ण अंबानी परिवाराचे अभिनंदन करतो. हा खरोखरच आनंदाचा दिवस आहे. मुलासाठी खूप प्रेम आणि आशीर्वाद. गेल्या वर्षी मार्चमध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं धूमधडाक्यात लग्न झालं होतं. आता त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. श्लोका यांनी मुंबईच्या रुग्णालयात मुलाला जन्म दिला. आई आणि मुलाची तब्येत उत्तम असल्याचं मुकेश अंबानी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अंबानी परिवारातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, श्लोक आणि आकाश अंबानी हे आज आई-बाबा झाले आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांना पहिल्यांदाच आजी-आजोबा म्हणून बढती मिळाली आहे. "धीरुभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या नातवाचं परिवारात स्वागत आहे. या नव्या पाहुण्याच्या येण्यामुळे अंबानी आणि मेहता कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत", असं या निवेदनात म्हटलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mukesh ambani

    पुढील बातम्या