विक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी

विक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी

विक्रम लँडरशी (Lander Vikram) संपर्क होण्याची आशा आता जवळजवळ संपुष्टात आली असली, तर या मोहिमेशी संबंधित एक चांगली बातमी आली आहे. ISRO ने या मोहिमेसंदर्भात बातमी दिली आहे.

  • Share this:

बंगळुरू, 21 सप्टेंबर : ISRO ची महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 (Chandrayaan 2)  ही मोहीम अखेर विक्रम लँडरशी संपर्काविनाच पुढे जाणार. विक्रम लँडरशी (Lander Vikram) संपर्क होण्याची आशा आता जवळजवळ संपुष्टात आली असली, तर या मोहिमेशी संबंधित एक चांगली बातमी आली आहे. इस्रोचे प्रमुख सिवन यांनी सांगितलं की, चांद्रयान 2 बरोबर असलेला ऑरबिटरचं (Orbiter) काम अपेक्षेप्रमाणे सुरू आहे. ऑरबिटरवर 8 उपकरणं लावलेली आहेत. या उपरकरणांचं काम सुरू झालं असून ते उत्तम काम करत आहेत. त्यामुळे इस्रोने आता पुढच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे लक्ष वेधलं आहे. गगनयान या मोहिमेची तयारी आता ISRO ने सुरू केली आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या जागी विक्रमचं लँडिंग झालं त्या भागात आता पुढचे 14 दिवस अंधार असेल. सूर्यकिरणं त्या भागापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे चंद्रावर या भागाचं तापमानसुद्धा खूप कमी होईल. ते उणे 183 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.

ऑर्बिटरचे काम सुरू

यावेळी सिवन यांनी, भारताचे ऑर्बिटर चांगले काम करत असल्याचे सांगितले. यात 8 उपकरणे आहेत, जे आपले काम करत आहे. ऑर्बिटरनं फोटो पाठवण्या सुरुवात केली आहे, शास्त्रज्ञ या फोटोंची तपासणी करत आहेत. ऑर्बिटरवर 8 पेलॉड आहेत. जे चंद्रवर थ्री-डी मॅपिंगसह दक्षिण ध्रवावर पाणी, बर्फ आणि मिनरल्स शोधण्याचे काम करतील. ऑर्बिटरचा कार्यकाळ एक वर्षांचा असणार आहे.

वाचा - चांद्रयान-2नंतर भारत घेणार आणखी एक झेप, इस्रोनं जाहीर केले ‘मिशन गगनयान’

नासाने केलं इस्त्रोचं कौतुक

नासाने नुकतंच भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इस्रो) चांद्रयान -2 अभियानाचे कौतुक केलं होतं. नासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'अंतराळात संशोधन करणं एक कठीण काम आहे. चांद्रयान -2 मिशनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नांचं आम्हाला अतिशय कौतुक आहे.

रताच्या चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रमसोबत केवळ इस्त्रोच्या नाही तर साऱ्या देशाच्या आशा होत्या. इस्त्रोच्या अपेक्षा होत्या की, लँडर विक्रमशी संपर्क होईल, मात्र तसे झाले नाही. तरी, इस्रोच्या प्रयत्नांचे देश आणि जगभरातून कौतुक करण्यात आले. विक्रम लँडरचा संपर्क तुटला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची इस्रोच्या नियंत्रण कक्षात होते.

खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून 'या' गोष्टी होणार स्वस्त

त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला होता. दरम्यान आता इस्त्रोकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रोचे प्रणुख के. सिवन यांनी विक्रमशी संपर्क होत नसल्यामुळं आता आमचे लक्ष मिशन ‘गगनयान’वर असल्याचे सांगितले. याशिवाय सिवन यांनी एएनआयशी बोलताना विक्रम लॅंडरशी संपर्क होण्याच्या सर्वच शक्यता मावळल्या असल्याचे मान्य केले.

केवळ एक दिवसांचे होते विक्रमचे जीवन

आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान -2 ने अनेक अडथळे पार केले.

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, सोशल मीडियावर येणार ही बंधनं

मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना अनियंत्रित वेगामुळं हार्ड लँडिंग झाली. दरम्यान, चांद्रयान-2च्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरची काही छायाचित्रे पाठवली होती. त्यानंतर इस्रोनं विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळू शकलं नाही. लॅंडरचा जीवनकाळ चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचा 14 दिवस आहे. 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लॅंडरचे जीवन शनिवारी संपले. 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत एक दिवस पूर्ण झाल्यानंतर शनिवारी चंद्रावर रात्र होईल. त्यामुळं सिवननं यांनी गगनयानचे संकेत देत विक्रम लॅंडरचा संपर्क होणे शक्य नसल्याचेही संकेत दिले.

------------------------------------------------------------

VIDEO : निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 21, 2019, 4:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading