Chandrayaan-2ने चंद्रावर उतरण्याआधी दिली आनंदाची बातमी; ऑर्बिटर करणार ही कामगिरी!

Chandrayaan-2ने चंद्रावर उतरण्याआधी दिली आनंदाची बातमी; ऑर्बिटर करणार ही कामगिरी!

चांद्रयान-2 संदर्भात सर्वांना आनंद देणारी बातमी समोर आली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 28 मार्च: Chandrayaan-2 कधी एकदा चंद्राच्या भूमीवर उतरणार याची जगासह सर्व भारतीयांना कमालीची उत्सुकता लागली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी 22 जुलै रोजी रवाना झालेल्या ISROच्या या महत्त्वाकांशी मोहिमेकडे सर्वांचे लक्ष आहे. चांद्रयान-2 संदर्भात सर्वांना आनंद देणारी बातमी समोर आली आहे. चांद्रयान-2मधील ऑर्बिटरचा कालावधी एक वर्षाचा होता तो आता आणखी एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. याआधी ISROने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-2मधील ऑर्बिटरचा कालावधी एक वर्षाचा होता. पण आता त्याचा कालावधी दोन वर्ष इतका केला जाऊ शकतो.

ISROने 978 कोटी रुपये खर्च करून ही महत्त्वाकांक्षी मोहीम चंद्राच्या दिशेने रवाना केली आहे. या मोहिमेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते वर्तमान परिस्थितीत पाहता ऑर्बिटरचा कालावधी आणखी 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. याआधी ISROचे चेअरमन के.सिवन यांनी 12 जून रोजी सांगितले होते की ऑर्बिटर केवळ 1 वर्षच काम करेल. चांद्रयान-2 मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-1 ची निर्मिती अधिक काळ काम करेल अशी केली होती. पण पॉवर कन्वर्टरमध्ये आलेल्या अडचणीमुळे त्याचा कालावधी लवकर संपला. चांद्रयान-2मध्ये ही अडचण दूर करण्यात आली आहे. चांद्रयान-2मध्ये एक वर्षापेक्षा अधिक काळ काम करण्यासाठी इंधन उपलब्ध आहे.

Chandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण? ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद!

ऑर्बिटरचे प्रक्षेपण करताना त्यामध्ये 1 हजार 697 किलोग्रॅम इंधन होते. 24 आणि 26 जुलै रोजी त्यात 130 किलोग्रॅम अतिरिक्त इंधन भरण्यात आले. शनिवारी ऑर्बिटरमध्ये 1 हजार 500 किलोग्रॅम अधिकचे इंधन शिल्लक होते. प्रक्षेपण अधिक चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे 40 किलो इंधनाची बचत झाल्याचे एका वैज्ञानिकाने सांगितले.

SPECIAL REPORT : चांद्रयान -2 चा अवकाशात कसा असेल प्रवास?

सुरुवातीच्या नियोजनानुसार ऑर्बिटरमधील अतिरिक्त इंधन आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ठेवण्यात आले होते. पण सध्याच्या परिस्थितीनुसार ऑर्बिटमध्ये एक वर्षापेक्षा अधिक काम करण्यात इतके इंधन शिल्लक आहे. चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी चांद्रयान-2चे नऊ वेळा स्थान बदलेले जाईल. यासाठी ऑर्बिटरमधील इंधनाचा वापर केला जाईल. चांद्रयान-2ची कक्षा बदलल्यानंतर ऑर्बिटरकडे 290.2 किलोग्रॅम इंधन आवश्यक आहे. चांद्रयान-2मध्ये सध्या इतक इंधन आहे की ते चंद्राच्या कक्षेत दोन वर्ष फेरी मारू शकते.

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर धावली सुसाट रिक्षा, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Jul 28, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading