Home /News /national /

48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; येत्या 2 दिवसात महागाई भत्त्याबाबत घेणार निर्णय

48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी; येत्या 2 दिवसात महागाई भत्त्याबाबत घेणार निर्णय

या नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. हे वृत्त डीए DA महागाई भत्त्याशी जोडलेली आहे. सर्व ठीक राहिलं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना भविष्यात चांगला महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्र सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे.  हे उपभोक्‍ता मूल्‍य सूचकांक म्हणजेच CPI-IW च्या बेस इअर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल. या नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. रिपोर्ट्सनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी सरकार CPI-IW च्या आधार वर्षात बदल करू शकते आणि सविस्तर माहिती जारी करू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने डीए देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे आणि याची प्रक्रियादेखील सुरू होणार होती, मात्र मार्चमध्ये कोरोना महासाथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये डीए देण्यावर बंधन लावले. हे नियंत्रण 2021 पर्यंत लावण्यात आले आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता दिला जातो तो 17 टक्के आहे. नुकतेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी प्री-पेड भेटवस्तू घोषित केल्या होत्या. या शॉपिंग कार्डचा उपयोग कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत करू शकतात. हे ही वाचा-25000 पगार असणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकार देणार 19 प्रकारच्या सुविधा आता 21 ऑक्टोबरवर लक्ष्य केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष्य आता 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निर्णयावर आहे. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार या दिवशी नवीन CPI-IW सीपीआय-आयडब्ल्यू सूचकांक जारी करू शकतात. जर यात बदल केला जाईल तर कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल. कारण वेतन आणि डीएचं आकलन या सीपीआय-आयडब्ल्यूवर आधारित आहे. जेव्हा याला आधार वर्षात परिवर्तीत केला जाईल, तर सरळ महागाई भत्तेवर प्रभाव पडेल. सीपीआय-आयडब्ल्यूच्या आधार वर्ष बदलण्यासाठी खासगी क्षेत्रातील कामगारांच्या कमीत कमी वेतनातही वाढ होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या