मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी, ICMR ने केलेल्या संशोधनातून मोठा खुलासा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी, ICMR ने केलेल्या संशोधनातून मोठा खुलासा

भारतात कोरोना झपाट्याने पसरेल अशी भीती व्यक्त केली जात होती, त्या धर्तीवर या संशोधनातून सकारात्मक बाब समोर आली आहे

भारतात कोरोना झपाट्याने पसरेल अशी भीती व्यक्त केली जात होती, त्या धर्तीवर या संशोधनातून सकारात्मक बाब समोर आली आहे

भारतात कोरोना झपाट्याने पसरेल अशी भीती व्यक्त केली जात होती, त्या धर्तीवर या संशोधनातून सकारात्मक बाब समोर आली आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 19 मार्च : सध्या देशभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग सतत वाढत जात असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्या पार्श्वमूमीवर भारतात एक चांगली बातमी समोर आली आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) असा दावा केला आहे की, कोरोना (Covid - 19) विषाणू भारतातील समाजात पसरत नाही. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीमध्ये सकारात्मक लक्षणे आढळली तरी सर्व परिसरात हा आजार पसरत नाही. सतत येणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या धर्तीवर ही एका सकारात्मक बाब आहे.

संबंधित - रेल्वेने रद्द केल्या 500 हून अधिक गाड्या,गाड्यांची उपलब्धता तपासूनच घराबाहेर पडा

आयसीएमआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागातून सुमारे 1000 नमुने घेण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा दुसरा टप्पा अजूनही देशात असल्याचे आढळून आलेले नाही. ज्या नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहेत, ते परदेशात गेलेले नाहीत किंवा परदेशात गेलेल्या कोणाशीही त्यांनी संपर्क साधलेला नाही. या नमुन्यांच्या आधारे हे उघडकीस आले आहे की कोरोना विषाणूने अद्यापपर्यंत एक गंभीर फॉर्म घेतला नाही. अशा परिस्थितीत हा आजार सहज एकमेकांमध्ये पसरू शकत नाही

आयसीएमआरने हे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांना तपासणीसाठी पाठविले. आज दुपारपर्यंत याचा तपशीलवार अहवाल समोर येईल.

आयसीएमआरने केलेल्या तपासणीनुसार...

- देशातील 52 टेस्टिंग लॅबमधून 1000 सॅंपल घेण्यात आले आहेत

- या 1000 जणांनी परदेशात प्रवास केलेला नाही किंवा यापूर्वीही त्यांचा परदेश दौरा झालेला नाही

- 17 मार्च रोजी प्रारंभिक 500 नमुना अहवाल आला, ज्यामध्ये सर्वजण कोरोना नेगेटिव्ह आढळून आले.

- आयसीएमआर आता दर आठवड्याला अशाप्रकारे नमुने घेऊन त्यांची तपासणी करेल.

- या निकालांच्या आधारे केंद्र सरकार देशातील कोरोना विषाणूची चाचणी घेण्याचे धोरण बदलत राहील

छत्तीसगडमध्ये कोरोनाची पहिली सकारात्मक घटना घडली, देशभरात एकूण 175 जणांना संसर्ग झाला

आतापर्यंत कोरोना विषाणूची एकूण 175 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत सकारात्मक घटनांची संख्या वाढली आहे. बुधवारी देशभरातून सुमारे 24 प्रकरणे नोंदली गेली, आता गुरुवारीही बरीच प्रकरणे समोर आली आहेत.

आतापर्यंत भारतात या विषाणूमुळे तीन मृत्यू झाले आहेत.

संबंधित - Quarantine चा शिक्का असलेल्या 6 जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवलं

First published:

Tags: Corona virus in india