मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिलासादायक बातमी, 8 राज्यासह केंद्रशासित भागात कोरोनामुळे मृत्यू नाही!

दिलासादायक बातमी, 8 राज्यासह केंद्रशासित भागात कोरोनामुळे मृत्यू नाही!

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे मागील दोन तासांत भारतामध्ये 3.23 लाख नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, पण...

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे मागील दोन तासांत भारतामध्ये 3.23 लाख नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, पण...

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे मागील दोन तासांत भारतामध्ये 3.23 लाख नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, पण...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 28 एप्रिल : देशभरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण, मंगळवारी काहीसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळाले आहे. देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित ( Union Territories) भागात कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद झाली नाही. तसंच, केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी पुरवल्या आहे. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत मृत्यूची नोंद झाली नाही.

दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लडाख (यूटी), त्रिपुरा, लक्षद्वीप, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या भागात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लसीकरण या भागात केले आहे. राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशात लसीकरणावर भर दिला असून मोफत वाटप करण्यात आले आहे.  आतापर्यंत वाया गेलेल्या लशीसह एकूण वापर 14,64,78,983 डोस झाला आहे.

टॉयलेटमध्ये मिळाली होती सर्वात मोठी भूमिका; पाहा शर्मन जोशीचा भन्नाट किस्सा

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे मागील दोन तासांत भारतामध्ये 3.23 लाख नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, तर 2700 हून अधिक मृत्यूची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 तासांत एकूण 3 23,144 नवीन कोरोनाबाधित रुग्ण, 2771  मृत्यू आणि 2,51,827   रुग्ण बरे होऊन घरी परतलेआहे. तसंच, एकूण २ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 28,82,204, झाली आहेत.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये 71.68 टक्के नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 895 जणांचा कोरोनामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. तर  66,358 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

तर पंजाबमध्ये 5,932 नवीन COVID19 रुग्णांची भर पडली आहे. तर 100 जणांचा मृत्यू झाला हे.  3,774 रुग्ण बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण रुग्ण संख्या ही 3,51,282 इतकी आहे.

धमाकेदार ऑफर्स! 20 रुपयांहूनही कमी किमतीत मिळतोय 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

तर कर्नाटकमध्ये  31,830 नवीन रुग्ण आढलून आले आहे.  180 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10,793 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण रुग्ण संख्या 14,00,775 वर पोहोचली आहे.

गुजरातमध्ये 14,352 नवीन रुग्ण आढळले आहे. तर  170 जणांचा मृत्यू झाला आहे. 7,803 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर राजधानी दिल्लीत 24,149 नवीन रुग्ण संख्या आढळून आली आहे.  381 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17,862 रुग्ण बरे झाले आहे. रुग्ण संख्या 10,72,065 वर पोहोचली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली होती आणि आता 1 मे पासून तरुणांच्या लसीकरणाला दिले जाणार आहे. ती आणखी वेगवान केले जाणा आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

First published: