नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आत्मनिर्भर भारत (Aatm nirmal bharat) अभियान यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. शनिवारी मोदींनी भारतीय खेळण्यांची निर्मिती आणि संपूर्ण जगावर छाप पाडण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा केली. यासाठी त्यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यामध्ये मोदींनी सांगितले की, भारत कित्येक हजार कामगार आहेत. भारतीय कामगार हा केवळ संस्कृतीच नाही तर लहान मुलांचं जीवन-कौशल्य आणि मनोविकास करण्यासाठी मदत करतात.
खेळण्यांची मागणी वाढतेय
कोरोना व्हायरसमुळे देशभरात शाळा बंद आहेत. अशात मुलं घरात अभ्यास व खेळ खेळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम खेळ व्यापारावर झाला आहे. चीन आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या तणावामुळे देशात चिनी खेळण्यांची मागणी कमी झाली आहे, याचा फायदा भारतीय खेळ निर्मात्यांना मिळत आहे. बाजारात लहान मुलांच्या खेळण्यांची मागणी वाढत आहे.
या बैठकीत मोदींनी सांगितले की या प्रकारे समुहांना नव्या आणि रचानात्मक पद्धतीने प्रोत्साहन द्यायला हवं. मंत्रींनी या बैठकीत सांगितले की भारतीय खेळण्यांचा बाजारात वाढीच्या शक्यता अधीक आहेत आणि हे आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत Vocal for Local ला प्रोत्साहन देत उद्योगक्षेत्रात एक परिवर्तन करू शकतं. पंतप्रधान पुढे म्हणाले की नव्या कल्पनांवर लक्ष केंद्रीत करायला हवं आणि विश्वाच्या अपेक्षांना पूर्ण करणारी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करायला हवी.