Gold Futures Price : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; वाचा काय आहेत भाव?

Gold Futures Price : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; वाचा काय आहेत भाव?

मंगळवारी संध्याकाळी सोन्यासह चांदीच्या वायदा बाजाराच मोठी घसरण दिसून आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : सध्या देशभरात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे सोने-चांदीमध्ये चढ-उतार होत आहेत. मंगळवारी (आज) सोन्या-चांदीच्या किंमतीत लक्षणीय घसरण दिसून आली. मंगळवारी सायंकाळी 5 जून 2020 चा सोन्याचे वायदा भाव एमसीएक्स एक्सचेंजमध्ये 0.51 टक्क्यांनी घसरून 45,955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करीत होते. त्याचबरोबर मंगळवारी संध्याकाळी 5 ऑगस्ट 2020 चे सोन्याची वायदा किंमत एमसीएक्सवर 0.48 टक्क्यांनी घसरून एमसीएक्सवर 46,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करीत होते. देशभरात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढल्याने मंगळवारी देशभरात सोन्या-चांदीच्या स्पॉट मार्केट बंद होते.

मंगळवारी संध्याकाळी सोन्यासह चांदीच्या वायदा बाजाराच मोठी घसरण दिसून आली. मंगळवारी संध्याकाळी एमसीएक्सवरील चांदीचा वायदा भाव (5 मे 2020) 41,690 रुपये प्रतिकिलो होता. त्याशिवाय चांदीचा वायदा (3 जुलै 2020) 169 रुपयांनी घसरून 42,351 रुपये प्रतिकिलो राहिला. जागरणने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास मंगळवारी संध्याकाळी सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्येही घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते, मंगळवारी संध्याकाळी सोन्याच्या जागतिक   किंमत 1,711.74 प्रति डॉलरवर घसरण झाली.

वायदा बाजार काय आहे?

सोन्याचा व्यापार दोन प्रकारे होतो. एक स्पॉट मार्केटमध्ये आणि दुसरे फ्युचर्स म्हणजे वायदा बाजारात. वायदा बाजाराला कमोडिटी एक्सचेंज असेही म्हणतात. वायदा बाजारात वस्तू डिजिटल स्वरुपात विकल्या जातात. वायदा बाजारात वस्तूच्या जुन्या व नव्या किंमतींच्या आधारे भविष्यातील किंमतींवर डील केले जातात. या बाजारात निश्चित तारखेपर्यंत व्यवहार केला जातो. वायदा बाजाराचा थेट परिणाम स्पॉट मार्केटवर होतो. स्पॉट मार्केट आणि वायदा बाजारातील वस्तूंच्या किंमतींमध्ये कोणताही मोठा फरक नाही.

संबंधित-CRPF मध्ये कोरोनाचा पहिला बळी, 55 वर्षांच्या जवानाने सोडले प्राण; 46 जणं बाधित

First published: April 28, 2020, 10:35 PM IST

ताज्या बातम्या