सोनं जाणार आवाक्याबाहेर, जाणून घ्या नवे दर

सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे.

  • Share this:

सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी काहीशी निराश करणारी बातमी आहे.

कारण सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यातील विक्रमी वाढ झाली आहे.

जळगावमध्ये सोन्याची किंमत प्रतितोळा 34 हजार 500 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

सोनं लवकरच 35 हजारांचा टप्पा पार करेल, अशी शक्यताही यासंबंधी तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

या दरवाढीला भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध हेदेखील महत्त्वाचं कारण असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

नोव्हेंबर महिन्यात जळगावमधील प्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या विक्रीत प्रचंड उलाढाल झाली होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं ग्राहकांना सोनं खरेदी करायची उत्तम संधी निर्माण झाली होती.

मागील वर्षी दिवाळी, लक्ष्मीपूजन असल्यामुळे लोकांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली. त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. परंतु नंतर सोन्याच्या भावात हजारो रुपयांनी घसरण झाली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोनं खरेदीसंदर्भात एक योजना घोषित केली होती.

गोल्ड बॉण्ड योजनेतून कोणीही सोनं खरेदी करु शकतं. गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्यावर व्याजही मिळेल. याशिवाय ऑनलाइन खरेदी केल्यास ५० रुपयांची सूट मिळणार आहे.

यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर हा कालावधी ठरवण्यात आला आहे. तुम्हाला या योजनेचा फायदा करुन घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आता केवळ दोनच दिवस बाकी आहेत.

भारत बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लिमिटेड मार्फत ३ दिवस आधीच्या 999 शुद्ध सोन्याच्या किंमतीच्या आधारे गोल्ड बॉण्डची किंमत ठरवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वर्षाला 2.5 टक्के व्याजही मिळणार आहे. यावेळी गोल्ड बॉण्डची किंमत 3 हजार 214 रुपये प्रति ग्रॅम इतकी निश्चित करण्यात आली आहे.

गोल्ड बॉण्डची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन ऑप इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त शेअर बाजारात केली जाईल.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवर गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ ऑनलाइन घेण्याचं आवाहन केलं आहे. डिजीटल पेमेंट केल्यावर 50 रुपयांची सूट मिळणार आहे. सरकारकडून डिजीटल पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात आहे. यात गोल्ड बॉण्डमध्ये दिली जाणारी सूट ही लोकांना डिजीटलकडे वळवण्याचा एक प्रयत्न आहे.

गोल्ड बॉण्ड योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली होती. याचा उद्देश सोन्याची वाढती मागणी कमी करणं हा आहे. सोनं खरेदी करुन घरी ठेवण्यापेक्षा गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर टॅक्सही वाचवता येतो.

गोल्ड बॉण्ड सोन्याच्या किंमतीशी संबंधित असतात. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास गुंतवणूकही वाढते. यासाठी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. या योजनेतून बॉण्डवर कर्जही घेता येतं. गोल्ड बॉण्ड हा पेपर आणि इलेक्ट्रीक स्वरुपात असणार आहे. यासाठी सोनं लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्चही करावा लागत नाही.

सोन्याची किंमत कमी झाल्यास रिटर्न कमी होतो. यावर उपाय म्हणून सरकार दीर्घ मुदतीचे गोल्ड बॉण्ड जारी करणार आहे. गोल्ड बॉण्ड योजनेचा कालावधी 8 वर्षांचा असतो पण तुम्हाला 5 वर्षांनंतरही पैसे काढता येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 02:13 PM IST

ताज्या बातम्या