राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठा समाजाचा विचार करा – संभाजी राजे

राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठा समाजाचा विचार करा – संभाजी राजे

  • Share this:

दिल्ली, ता. 24 जुलै : मराठा मोर्चाला आता हिंसक वळण लागलं आहे. राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या हा मु्द्दा राज्यसभेत आणि लोकसभेत देखील गाजला. या मुद्द्यावर खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजाला कायदा हातात न घेण्याचे आवाहन करुन, नेत्यांनीसुद्धा पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी मराठा समाजासाठी एकत्र यावं असं आवाहन केलं. याबबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दोन महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. लोकसभेत मांडलेल्या मुद्द्यांबाबत बोलतांना खासदार संभाजी राजे यांनी आपल्या भावना न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी प्रकट केल्या.

मराठा समाजाच्या भावना लोकसभेत मांडतांना खासदार संभाजी राजे यांनी प्रथम मराठा समाजाच्या आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले. राज्या मराठा समाजाचा जो आक्रोश निर्माण झाला आहे त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोन महत्त्वाच्या सुचना केल्या. या आंदोलनात ज्या ज्या घटकाने सहभाग दिला आहे, त्या सर्वाना समाधान लाभेल यासाठी त्वरित एक बैठक बोलवावी. आणि जे काही त्यांचे प्रश्न असतील ते मार्गि लावावेत.

Maratha Morcha Andolan: मराठा मोर्चाची उद्या मुंबई बंदची हाक

मुख्यमंत्र्यांना केलेल्या दुसऱ्या सुचनेसंदर्भात बोलताना संभाजी राजे यांनी सांगितले की, हा संपूर्ण मराठा समाजाचा प्रश्न आहे, आणि तो सोडवितांना सर्व नेत्यांनी राजकारणापलीकडे जाऊन मराठा समाजाचा विचार कराणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना त्यासाठी एकत्र यावे लागेल. आणि मराठा समाजाकरिता आपण काय करु शक्तो याचा विचार करावा.

आंदोलकांच्या भावना आणि त्यांची तिव्रता मी समजू शक्तो, जर काही अघटित घडल्यास त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागतील. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये असे कळकळीचे आवाहन त्यानी न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सागर वैद्य यांच्याशी बोलतांना केले.

हेही वाचा...

VIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

मुलुंडमध्ये रिक्षेवर पिंपळाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू, दोनजण जखमी

Maharashtra Bandh: औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 06:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading