1.11 कोटींच्या नोटांनी देवीची सजावट; तेलंगणातील 'या' मंदिरात अनोखी पूजा

1.11 कोटींच्या नोटांनी देवीची सजावट; तेलंगणातील 'या' मंदिरात अनोखी पूजा

दसऱ्यानिमित्त तेलंगणातील एका मंदिरात 1.11 कोटी किंमतीच्या नोटांपासून बवनलेला हार देवीला वाहण्यात आला.

  • Share this:

हैदराबाद, 27ऑक्टोबर :तेलंगणातील कन्यका परमेश्वरी मंदिरात 1.11 कोटी रुपये किंमतीच्या नोटांपासून तयार केलेल्या ओरिगामी फुलांनी देवीची सजावट करण्यात आली होती. दसऱ्याच्या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजकांनी विविध माळा आणि रंगांच्या चलनात असलेल्या नोटा यामधून तयार केलेल्या ओरिगामी फुलांचे हार यांनी देवीची सजावट केली होती. दरवर्षी दसऱ्यानिमित्त एका वेगळ्या प्रकारे देवीची सजावट या मंदिरात केली जाते. जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील मंदिरात ही अनोखी भेट देवीला अर्पण करण्यात आली. या सजावटीसाठी सुमारे 1,11,11,111 रुपये किंमतीच्या नोटा वापरण्यात आल्या होत्या.

आर्य वैश्य संघटनेतर्फे नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी धनलक्ष्मीच्या अवतारात देवीची पूजा केली. कोरोना (covid-19) या आजाराचं थैमान जगभर सुरू असताना कित्येक महिन्यानंतर मंदिरात प्रवेश केलेल्या भक्तांचे या सजावटीने लक्ष वेधून घेतले. ही सजावट भाविकांचे डोळे दिपून टाकणारी होती. लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असतांना मंदिरंसुद्धा बंद करण्यात आली होती. त्यानंतर उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात थोडा काळ का होईना पण भाविकांना प्रवेश मिळाला. त्यावेळी देवीची ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेणारी अशी होती. कोरोनाचा परिणाम या वर्षीचा सगळ्याच सण - उत्सवांवर झाला. तरीसुद्धा या मंदिराच्या आयोजकांच्या अथक प्रयत्नांमुळे यावर्षी देवीचा उत्सव थोड्या प्रमाणात का होईना थाटामाटात झाला.

मंदिराचे खजिनदार पी रामू यांच्या मते, 2017 साली देवीची अशीच सजावट ही 3,33, 33,333 रुपये किंमतीच्या नोटा वापरून करण्यात आली होती. त्यावेळीसारखीच या वर्षीही मंदिराला उत्सव साजरा करताना आर्थिक चणचण जाणवली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार जे कलाकार विविध रंगांच्या चलनी नोटांच्या माळा आणि पुष्पगुच्छ बनवतात. तेच कलाकार मंदिराच्या सजावटीचं कामं करतात. यासाठी चलनात असलेल्या रंगीबेरंगी नोटा वापरल्या जातात जेणेकरून सजावट आणखी सुंदर दिसते.

या सजावटीची विशेष गोष्ट म्हणजे स्थानिक भाविकांकडून पैसे गोळा केले जातात आणि उत्सवानंतर त्यांना ते परत केले जातात. सर्व देशभर सुरु असलेल्या साथीच्या रोगांमुळे आणि आर्थिक मंदीमुळे यावेळी सजावटीसाठीचे पैसे कमी प्रमाणात जमा झाले. त्यामुळेच उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकला नाही. दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा उत्सव यावर्षी आर्थिक मंदीमुळे काही छोट्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यामुळेच दान देणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा कमी झाली.  आयोजकांना दान जमा करण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागले. कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. कुठल्याही प्रकारची गर्दी न करता सर्वांना दर्शन घ्यायला मिळावे यासाठी मंदिरात वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. पुढल्या वर्षी यंदापेक्षा ही चांगल्याप्रकारे देवीचा उत्सव करण्याची इच्छा आहे असेही आयोजकांनी सांगितले.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 27, 2020, 9:08 PM IST
Tags: temple

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading