मराठी बातम्या /बातम्या /देश /तिरडीवर मृतदेह, फुलांचे हार अन् ब्राह्मण भोजन; बकरीच्या आगळ्यावेगळ्या अंत्यसंस्काराची एकच चर्चा

तिरडीवर मृतदेह, फुलांचे हार अन् ब्राह्मण भोजन; बकरीच्या आगळ्यावेगळ्या अंत्यसंस्काराची एकच चर्चा

बकरीचा मृतदेह लाकडावर ठेवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारानंतर बकरीच्या मालकाने ब्राह्मणांसाठी भोजनाचं आयोजनही केलं.

बकरीचा मृतदेह लाकडावर ठेवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारानंतर बकरीच्या मालकाने ब्राह्मणांसाठी भोजनाचं आयोजनही केलं.

बकरीचा मृतदेह लाकडावर ठेवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारानंतर बकरीच्या मालकाने ब्राह्मणांसाठी भोजनाचं आयोजनही केलं.

नवी दिल्ली 05 डिसेंबर : जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्याकडील पाळीव प्राण्यांची अगदी पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. मात्र त्रास तेव्हा होतो, जेव्हा हे प्राणी आपल्याला सोडून जातात. उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पाळीव बकरीच्या निधनानंतर असं काही केलं, जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथल्या एका व्यक्तीने आपल्या बकरीच्या मृत्यूनंतर बकरीवर अंत्यसंस्कार केले. एखाद्या माणसाप्रमाणेच या बकरीवरही (Funeral Of Goat) अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशांबीमध्ये झालेल्या या अंत्यसंस्काराचे फोटो व्हायरल (Goat Funeral Viral Photos) झाले आहेत. बकरीचा मृतदेह तिरडीवर ठेवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारानंतर बकरीच्या मालकाने ब्राह्मणांसाठी भोजनाचं आयोजनही केलं. हे आगळंवेगळं पशुप्रेम पाहून सगळेच थक्क झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रामप्रकाश यादव यांनी बकरीला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं. त्याने बकरीचं नाव कल्लू ठेवलं होतं. संपूर्ण कुटुंबीय कल्लूवर भरपूर प्रेम करत असे.

काही दिवसांपासून कल्लूची प्रकृती बिघडली होती. बरीच काळजी घेऊनही कल्लूचं निधन झालं. कल्लूच्या मृत्यूनंतर रामप्रकाश यांनी बकरीला माणसाप्रमाणेच निरोप देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत बकरीला अंघोळ घालून तिरडीवर मृतदेह ठेवला. यानंतर हिंदू धर्मानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

यानंतर कल्लूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ब्राह्मण भोजनाचे आयोजनही केलं. कल्लूच्या मृत्यूनंतर रामप्रकाश यांचं संपूर्ण कुटुंब दुखात आहे. कुटुंबातील सदस्यांनी यानंतर टक्कलही केले. रामप्रकाश यांनी सांगितलं की कल्लू साडेपाच वर्षांचा होता. आता त्याच्या तेराव्याची तयारी केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Goat, Pet animal