मराठी बातम्या /बातम्या /देश /कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला; काय आहे कारण?

कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला; काय आहे कारण?

'मी तो अमरिंदर नाही'! कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला

'मी तो अमरिंदर नाही'! कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला

भारताच्या हॉकी टीमचा गोलकिपर अमरिंदर सिंग (Goalkeeper Amrinder Singh ) का वैतागला आहे?

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : पंजाबच्या राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग (Former Punjab CM Captain Amarinder Singh) यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान, अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर अमरिंदर सिंग वैतागला असल्याचे समोर आले आहे. त्याने ट्विट करत सर्वांना मला त्रास देऊ नका (Goalkeeper Amrinder Singh requests journalists )अशी विनवणी केली आहे. तर त्याला रिट्विट करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सहानभुती दर्शवली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग नावामुळे होत आहे घोळ

पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. काँग्रेसनं चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवले होते. मुख्यमंत्रीपदानंतर आता अमरिंदर सिंह काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.

दरम्यान,  पंजाब या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवुन असणारी माध्यमे अनावधानामुळे सुरु असलेल्या सर्व घडामोडी गोलकिपर अमरिंदर सिंगला टॅग करत आहेत. त्यामुळे गोलकिपर अमरिंदर सिंगला विनाकारन सहन करावा लागत आहे.

अखेर वैतागुन त्याने ट्विट करत सर्वांना मला त्रास देऊ नका अशी विनवणी केली आहे.

काय म्हटले आहे गोलकिपर अमरिंदरने?

''प्रिय बातम्या मीडिया, पत्रकार, मी अमरिंदर सिंग, भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक आहे - पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री नाही - कृपया मला टॅग करणे थांबवा.''अशा आशायाचे ट्विट गोलकिपर अमरिंदरने केले आहे. त्याच्या या रिट्विटला कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सहानभुती दर्शवली आहे. आणि त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत.

गोलकीपर अमरिंदर सिंगचे ट्विटर हँडल @Amrinder_1 आहे. तर कॅप्टन अमरिंदर यांचे ट्विटर हँडल @capt_amarinder आहे. लो क यावरून कन्फ्यूज झाले आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. काँग्रेसनं चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवले होते. मुख्यमंत्रीपदानंतर आता अमरिंदर सिंह काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.

First published:

Tags: Punjab