मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींच्या विरोधातील टिप्पणी महागात, विमान कंपनीकडून पायलट बडतर्फ!

पंतप्रधान मोदींच्या विरोधातील टिप्पणी महागात, विमान कंपनीकडून पायलट बडतर्फ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी ( Derogatory Remarks) केल्याचं एका पायलटला (Pilot) चांगलंच महागात पडलं आहे.  या पायलटला विमान कंपनीनं बडतर्फ केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 जानेवारी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी ( Derogatory Remarks) केल्याचं एका पायलटला (Pilot) चांगलंच महागात पडलं आहे.  या पायलटला विमान कंपनीनं बडतर्फ केलं आहे.  बडतर्फ करण्यात आलेल्या पायलटनं यापूर्वी  हवाई दलामध्येही (Air Force) काम केले होते.

काय आहे प्रकरण?

गो एअर (Go Air) विमान कंपनीचे पायलट मिक्की मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विट्सची कंपनीनी तातडीनं दखल घेत शनिवारी त्यांना नोकरीवरुन बडतर्फ केलं आहे. ‘गो एअर एअरलाईन्स या प्रकराच्या कोणत्याही गोष्टी कधीही खपवून घेणार नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नोकरीचे नियम, तसंच नीतीदर्शक तत्वांचं पालन करणे अनिवार्य आहे. सोशल मीडियावरील (Social Media) वर्तनाचाही यामध्ये समावेश आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा एअरलाईन्सशी कोणताही संबंध नाही’ असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पायलटनं मागितली माफी

या प्रकरणानं वेगळं वळण घेतल्यानंतर कॅप्टन मलिक यांनी माफी मागितली आहे. “माझ्या ट्विट्सचा कंपनीशी कोणताही संबंध नव्हता. ते संपूर्णपणे माझे वैयक्तिक विचार होते. मी या कृतीची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर या प्रकरणामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची माफी मागतो’’ असं मलिक यांनी स्ष्ट केलं आहे.

या प्रकरणात कंपनीनं केलेली कारवाई मान्य असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मलिक यांनी मोदींवर टीका करणारे आक्षेपार्ह ट्विट्स काढून टाकले असून ट्विटर अकांऊट बंद केले आहे.

First published:

Tags: Pm narenda modi