गोवा, 17 आॅगस्ट : दिल्ली विमानतळावर गोवा एअरवेजचं विमान थोडक्यात अपघातातून बचावलं. एक विमानाला अचानक धडकला. त्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत इमरजेंसी ब्रेक लावले त्यामुळे मोठा अपघात टळला. या विमानात 160 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवाहुन दिल्लीकडे गोवा एअरवेजचे विमान रवाना होणार होते. धावपट्टीवर विमानाने टेकआॅफ घेण्याच्या तयारीत होते तेव्हा अचानक एक पक्षी विमानाला येऊन धडकला. पक्ष्याने धडक मारल्यामुळे मोठा आवाज झाला त्यानंतर पायलटने इमरजेंसी ब्रेक लगावले. पायलटने ब्रेक लावल्यामुळे विमानाला मोठा अपघात होता होता वाचला. या विमानात एकूण 160 प्रवाशी प्रवास करत होते. या घटनेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप आहे.
VIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा