News18 Lokmat

संतापजनक ! मनोहर पर्रिकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं शुद्धीकरण?

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 09:19 AM IST

संतापजनक ! मनोहर पर्रिकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं शुद्धीकरण?

पणजी, 24 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव गोव्यातील कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पणजी येथे असलेल्या कला अकादमीत शनिवारी शुद्धीकरण करण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा : ...जेव्हा मनोहर पर्रीकरांनी एका झटक्यात 11 रुपयांनी स्वस्त केलं होतं पेट्रोल

गोव्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी शुद्धीकरणाच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही बाब गंभीर असून सरकारी इमारतीत अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही. सरकार कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नाही.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 09:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...