मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोव्यात उघड्यावर दारू पिण्यास बंदी! उल्लंघन केल्यास पिण्याची वासना राहणार नाही, सरकारचे कडक निर्बंध

गोव्यात उघड्यावर दारू पिण्यास बंदी! उल्लंघन केल्यास पिण्याची वासना राहणार नाही, सरकारचे कडक निर्बंध

गोव्यातील दारूबंदीबाबत पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील दारूबंदीबाबत पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील दारूबंदीबाबत पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

पणजी, 5 नोव्हेंबर : तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन अनेकदा केला असेल. गोव्यात तरुणांमध्ये पार्टी करण्याची प्रचंड क्रेझ आहे. तुम्हीही गोव्यात मित्रांसोबत पार्टी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गोवा सरकारने पर्यटन स्थळांसाठी कडक नियम आणले आहेत. या नियमांचे उल्लंघन करताना कोणीही आढळल्यास मोठा भुर्दंड बसू शकतो.

काही लोक गोव्यात फिरण्याबरोबरच ड्रिंकचा आनंद घेण्यासाठीही गोव्यात येतात. कारण गोव्यात स्वस्तात दारू मिळते. म्हणूनच लोक मित्रांसोबत एन्जॉय करतात आणि बीचवर बसून दारू पिऊन पार्टी करतात. पण आता असं करणे शक्य होणार नाही. कारण अलीकडेच पर्यटकांसाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन न केल्यास पर्यटकांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

आता मोकळ्या जागेत अन्न शिजवणे आणि दारू रिचवण्यावर बंदी

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, गोव्यात खुल्या ठिकाणी अन्न शिजवण्यावर आणि समुद्रकिनाऱ्याच्या बाहेर दारू पिण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कचरा पसरवणे, सार्वजनिकरित्या दारू पिणे, बाटल्या फोडणे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे पर्यटन क्षमता कमी होत आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. समुद्र किनाऱ्यावर वाहन चालविण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यावर फेरीवाले किंवा अधिकृत, अनधिकृत वाहनांना देखील बंदी असणार आहे. गोव्यातील किल्ले, मंदिर, चर्च, जंगल आदी ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव आहे. आता रेस्टॉरंटमध्ये बसूनच मद्यपान करता येईल.

वाचा - आयआरसीटीसीचं गोव्यासाठी टूर पॅकेज, केवळ 27 हजारांमध्ये गोव्याचं पर्यटन

अशा लोकांवरही होणार कारवाई

याशिवाय स्थानिक व्यवसायांसाठीही नियम लागू करण्यात आले आहेत. जलक्रीडा उपक्रमांना फक्त सीमांकन केलेल्या भागातच परवानगी असेल. सर्व प्रकारची तिकिटे केवळ अधिकृत तिकीट काउंटरवर विकली जातील, उघड्यावर विकली जाणार नाहीत. भीक मागणाऱ्या आणि जनतेला त्रास देणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे नव्या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच पर्यटकांच्या वाहतुकीत अडथळा आणणारे फेरीवाले आणि हातगाडीमालकांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Goa