पणजी, 28 एप्रिल: महाराष्ट्रापाठोपाठ आता शेजारी राज्य असणाऱ्या गोव्यातही लॉकडाऊनची (Lockdown in Goa) घोषणा करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी याबाबत घोषणा केली आहे. गुरुवारी संध्याकाळी अर्थात 29 एप्रिल संध्याकाळी 7 वाजल्यापासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गोव्यात 3 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅसिनोज, हॉटेल्स,पब्स इ. सर्वकाही या कालावधीत बंद राहणार आहेत. गोव्याच्या सीमा देखील केव अत्यावश्यक गोष्टींसाठीच खुल्या राहणार आहेत. बुधवारी प्रमोद सावंत यांनी याबाबत घोषणा केली आहे.
Lockdown announced in state from 29th April 7 pm to the morning of 3rd May. Essential services & industrial activities allowed, public transport to remain shut. Casinos, hotels, pubs remain closed. Borders to remain open for essential service transportation: Goa CM Pramod Sawant pic.twitter.com/PXaUfT5tkG
— ANI (@ANI) April 28, 2021
दरम्यान गोव्यामध्ये परिस्थिती भीषण आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी लॉकडाऊन अत्यंत आवश्यक असल्याचा इशारा आधीच दिला होता. तरी देखील गोव्यात लॉकडाऊन लागू करण्यास इतका उशीर का झाला असा सवाल विचारला जात आहे.
Imposing a lockdown is extremely crucial at this point if we wish to break the chain. I’ll be conducting a meeting with the Chief Secretary & with his guidance, we will come up with an appropriate solution that will be in the best interest of the people of Goa.
— VishwajitRane (@visrane) April 26, 2021
विश्वजीत राणे यांनी 26 एप्रिल रोजी ट्वीट करत लॉकडाऊनची आवश्यकता व्यक्त केली होती. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांना अशी माहिती मिळाली होती की येणाऱ्या दहा दिवसात दररोज 200 ते 300 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्र्यांनी अशी भीती व्यक्त केल्यानंतर आज जवळपास 48 तासानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
गोव्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक
संपूर्ण देशभरात गोव्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक म्हणजेच 38.03 टक्के आहे. गोव्यापाठोपाठ पश्चिम बंगाल-29.67%, पद्दुचेरी- 29.59%, छत्तीसगड- 27.5%, हरयाणा- 25.28% आणि महाराष्ट्र- 23.47% या राज्यांचा क्रमांक आहे.
गोव्यात आधी 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू आणि कलम 144 लागू करण्यात आला होता. ज्यानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई होती. शिवाय राज्यात विवाहसोहळा आणि अंत्यसंस्कारामधील लोकांची संख्या अनुक्रमे 50 आणि 20 पर्यंत मर्यादित आहे. दरम्यान आता गोव्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.