मराठी बातम्या /बातम्या /देश /चार वाघांच्या क्रूर मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं, कारण ऐकाल तर बसेल धक्का

चार वाघांच्या क्रूर मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं, कारण ऐकाल तर बसेल धक्का

गोव्यातल्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार वाघांना विष घालून मारण्यात आल्यामुळे संपूर्ण गोवा आणि वन्यजीव प्रेमींना हादरा बसलाय.

गोव्यातल्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार वाघांना विष घालून मारण्यात आल्यामुळे संपूर्ण गोवा आणि वन्यजीव प्रेमींना हादरा बसलाय.

गोव्यातल्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार वाघांना विष घालून मारण्यात आल्यामुळे संपूर्ण गोवा आणि वन्यजीव प्रेमींना हादरा बसलाय.

    पणजी, 12 जानेवारी : काही दिवसांपूर्वी गोव्यात चार वाघांचा अचानक मृत्यू झाला. एकामागोमाग एक वाघ मरण पावल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्यातच या वाघांना विषबाधा झाल्याचं उघड झालं आणि यामागचं गूढ वाढलं. अखेर या चार वाघांच्या मृत्यूचं कारण उलगडलं आहे. चार वाघांना विष घालून मारल्याची कबुली दोन शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं संपूर्ण गोवा आणि पर्यावरणप्रेमी हादरले आहेत. आता गोवा सरकार आणि म्हादई अभयारण्यातील रहिवाशांमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

    शेतकऱ्यांनीच घेतला जीव?

    काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या वाघांच्या हत्येचं रहस्य समोर आलं आहे. वाघांना विष घालून मारल्याची कबुली दिल्याने दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. विठो पावणे आणि मालो पावणे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या कबुलीनंतर देशभराता संतापाची लाट उसळली आहे. मात्र दोन शेतकऱ्यांनी वाघाला का मारलं याचं कारण ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

    का मारलं वाघांना?

    वाघांना ज्या गावात मारलं गेले ते गोळावली गाव म्हादई अभयरण्यात येतं. म्हादई अभयारण्याला इथल्या लोकांचा विरोध होता. मात्र लोकांचा विरोध डावलून म्हादई अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. अभयारण्याचा काही भाग व्याघ्र पट्ट्यात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र झाला. या विरोधात काही महिन्यांपूर्वी संतप्त जमावानं वन खात्याची चेकपोस्ट जाळली होती. अभयारण्य घोषित झाल्यानंतर तिथे वनअधिकारीच नेमला नाही. त्यामुळं लोकांनी घुसघोरी करून आपलं बस्तान बसवलं. काजू बागायती आणि शेती करण्यात आली आहे. शेतीसाठी उपयोगी असलेल्या म्हशी आणि गाईंना वाघांनी लक्ष्य केलं. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवून त्यांना नुकसानभरपाई नाकारण्यात आली. त्यातून शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला. सरकारकडून त्यांना मदत नाकारण्यात आली. त्यामुळं उदरनिर्वाहाचं साधन नष्ट करणाऱ्या वाघांना नष्ट करण्याचं शेतकऱ्यानं ठरवलं.

    कसं मारण्यात आलं वाघांना?

    गोळावली गावात 22 डिसेंबर 2019 ला वाघानं गाईची शिकार केली होती. या घटनेचा पंचनामा होऊन संबंधित मालकाला नुकसानभरपाई मिळाली . त्यानंतर त्या भागात कॅमेरे बसवण्यात आले.  त्यात 23 डिसेंबरला एक वाघीण आणि दोन बछडे या कॅमेऱ्यात दिसले तरीही गोवा सरकारला जाग आली नाही.

    हेही वाचा Zomato नंतर आता swiggy ही वादाच्या भोवऱ्यात, डिलिव्हरी बॉय करायचा असं..

    30 डिसेंबरला पुन्हा एकदा या भागात  वाघाने म्हशीची शिकार केली. पंचनामा करण्यात आला. मात्र मालकाला नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यानं मरण पावलेल्या म्हशीवर विष ओतून ठेवलं. वाघ आणि बछड्यांनी येऊन म्हशीचं मांस  खाल्लं. त्यामुळे वाघ आणि बछड्यांना विषबाधा झाली. त्यात सर्व  वाघांचा मृत्यू झाला.

    वाघांच्या सरंक्षणाची जबाबदारी कोणाची?

    गोव्यातील पर्यावरणप्रेमी  प्रा. राजेंद्र केरकर यांनी गोव्यातील जंगलात वाघ असल्याचं सांगून अभयारण्याची मागणी केली होती. वाघ असल्याचे पुरावेही त्यांनी दिले. त्यानंतर म्हादाई अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.

    वाचा - 'मंत्री' होऊन गोव्याला गेला आणि मसाजमुळे झाली पोलखोल!

    खरं तर 2002 सालच्या प्राणी गणनेत म्हादई क्षेत्रात पाच वाघ असल्याचं पुढे आलं होतं. मात्र त्यानंतरही गोवा सरकार ढिम्मच राहिलं.  या भागात वाघ नसल्याचं गोवा सरकारचे मंत्री सांगत होते. त्यामुळे गोव्यात अंदाधुंद खाण व्यवसाय सुरू राहिला.  गोव्यात 527 बेकायदा खाणी सुरू असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली होती. पण तरीही गोवा सरकारनं काहीही पावले उचलली नाही.  या दुर्लक्षामुळं वाघांना जीव गमवावा लागला.  खाण व्यावसायिकांनी बरंचसं जंगल तोडलं. त्यामुळं वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला. अजूनही म्हादईच्या जंगलात पाच वाघ असावेत अशी माहिती प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिली आहे. त्यामुळं आता तरी गोवा सरकार आणि वनविभाग वाघांना वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करतील अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली  आहे.

    वाचा - कुणी नाही दिला भाकरीचा तुकडा, शेवटी जिवंत कबुतराला खाल्लं!

    First published:
    top videos

      Tags: Goa, Tigers