गोव्यामधल्या स्कार्लेट एडन खून प्रकरणी आरोपीला 10 वर्षं तुरुंगवास

गोव्यामधल्या स्कार्लेट एडन खून प्रकरणी आरोपीला 10 वर्षं तुरुंगवास

गोव्यामध्ये झालेल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सॅमसन डिसुझाला 10 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणातला दुसरा आरोपी प्लासादो कार्व्हालो याची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

  • Share this:

पणजी, 19 जुलै : गोव्यामध्ये झालेल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सॅमसन डिसुझाला 10 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणातला दुसरा आरोपी प्लासादो कार्व्हालो याची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

काय होतं हे प्रकरण?

गोव्यामधल्या अंजुना बीचवर स्कारलेट मृतावस्थेत आढळली होती. 18 फेब्रुवारी 2008 ला हा खुनाचा प्रकार उघडकीला आला होता. त्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली होती.

15 ऑगस्टच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी नागरिकांकडे मागितल्या सूचना

गोव्यामधले दोन स्थानिक सॅमसन डिसूझा आणि प्लॅकिडो कार्व्हालो यांच्यावर, स्कारलेटवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा आरोप होता. गोव्यामधल्या मुलांसबंधीच्या खटल्यांचं कामकाज पाहणाऱ्या न्यायालयाने या दोघांची गेल्या वर्षी सुटका केली होती. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्यात आलं होतं. त्यावर कोर्टाने या सॅमसन डिसूझा याला दोषी ठरवलं.

तपास सीबीआयकडे

या प्रकरणाची चौकशी पहिल्यांदा गोवा पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. गोवा सरकारनेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. स्कारलेटची आई फिओना मॅकोन यांनी या चौकशीबद्दल शंका उपस्थित केल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला होता. स्कारलेट ही ब्रिटनमधली मुलगी गोव्यामध्ये पर्यटनासाठी आली असताना तिचा अशा प्रकारे निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे गोव्यातल्या परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

====================================================================================

लोकसभा: विषय सुरू होता कर्जमाफीचा आणि महिला खासदार हसत होत्या

First published: July 19, 2019, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading