मराठी बातम्या /बातम्या /देश /

PM Modi Birthday 2022 : PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'या' राज्यात गंभीर आजाराच्या रुग्णांना वर्षभर अर्थसहाय्य

PM Modi Birthday 2022 : PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'या' राज्यात गंभीर आजाराच्या रुग्णांना वर्षभर अर्थसहाय्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोव्याच्या राजभवनाने गरजू आणि समाजाच्या वंचित घटकांमधल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत (PM Narendra Modi 72nd Birthday)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोव्याच्या राजभवनाने गरजू आणि समाजाच्या वंचित घटकांमधल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत (PM Narendra Modi 72nd Birthday)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोव्याच्या राजभवनाने गरजू आणि समाजाच्या वंचित घटकांमधल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत (PM Narendra Modi 72nd Birthday)

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 16 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi 72nd Birthday) यांचा 72वा वाढदिवस शनिवारी, 17 सप्टेंबर 2022 रोजी आहे. त्या निमित्ताने गोव्याच्या राजभवनाकडून वर्षभर विशेष योजना राबवली जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत गंभीर आजार असलेल्या एकूण 216 पेशंट्सना गोव्याच्या राजभवनाकडून आर्थिक साह्य केलं जाणार असल्याची माहिती गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई  यांनी दिली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना पिल्लई यांनी 15 सप्टेंबर रोजी ही माहिती दिली. 'द प्रिंट'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोव्याच्या राजभवनाने गरजू आणि समाजाच्या वंचित घटकांमधल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. राजभवनाकडून पुढच्या एका वर्षात टीबीच्या 72, कॅन्सरच्या 72 आणि डायलिसिस करावं लागणाऱ्या 72 पेशंट्सना आर्थिक साह्य केलं जाणार आहे. याची सुरुवात मोदींच्या यंदाच्या वाढदिवसापासून केली जाणार असून, त्यात दिवशी या प्रत्येक आजाराच्या प्रत्येकी 10 पेशंट्सना अर्थसाह्य केलं जाईल,' असं राज्यपाल पिल्लई यांनी सांगितलं.

भारतात कुठे आहे जगातील पहिलं शाकाहारी शहर, जेथे मांस खाण्यासाठी आहे पूर्णपणे बंदी? जाणून घ्या

20 गायींसाठी बांधलेल्या निवारागृहाचं, तसंच बोन्साय गार्डनचं उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपालांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी मिरामार किनाऱ्याच्या स्वच्छतेच्या कार्यक्रमाची सुरुवातही केली जाणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.

भारतीय जनता पक्षानेही पंतप्रधानांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करायचं ठरवलं आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचं पक्षाने ठरवलं आहे. त्याअंतर्गत पक्षातर्फे जिल्हा पातळीवर नरेंद्र मोदींसंदर्भातली वेगवेगळी प्रदर्शनं आयोजित केली जाणार आहेत. 'Modi @20 सपने हुए साकार' या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठीही पक्षातर्फे नियोजन सुरू आहे. रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कृत्रिम अवयव आणि वैद्यकीय उपकरणांचं वाटप आदी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

कर्नाटक सरकारचा पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय, 'ट्रान्सजेंडर्स' साठी आरक्षण जाहीर

देश टीबीमुक्त करण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे वर्षभर कार्यक्रम राबवला जाणार असून, त्याअंतर्गत प्रत्येकाकडून एक टीबी पेशंट दत्तक घेतला जाईल आणि त्याची वर्षभर काळजी घेतली जाईल. तसंच, सेवा पंधरवड्याअंतर्गत भाजपतर्फे कोविड-19 प्रतिबंधक बूस्टर डोसबद्दल जागरूकता वाढवण्याचंही काम केलं जाणार आहे. वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रमांचाही यात समावेश आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे ऐच्छिक रक्तदानाची मोठी मोहीम 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत राबवली जाणार आहे. एक ऑक्टोबर हा ऐच्छिक रक्तदान दिवस असतो. भाजप एससी मोर्चातर्फे 17 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबरच्या संविधान दिनापर्यंत संपर्क अभियान राबवलं जाणार आहे.

भारतातून नामशेष झालेले चित्ते दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा भारतात आणले जाणार असून, ते मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधण्यात आलं आहे. पंतप्रधान शनिवारी (17 सप्टेंबर) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 'प्रोजेक्ट चीता' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भारतात चित्त्यांचं त्यांच्या मूळ अधिवासात पुन्हा संवर्धन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. भारतातून चित्ते नामशेष झाल्याचं 1952 साली अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं.

First published:

Tags: PM Modi birthday, PM narendra modi