गोव्यात 'Nude Party' पोस्टने खळबळ, परदेशी मुलींच्या सहभागाचा दावा

गोव्यात 'Nude Party' पोस्टने खळबळ, परदेशी मुलींच्या सहभागाचा दावा

गोव्यात न्यूड पार्टीमध्ये Unlimite Sex ची ऑफर देणारं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. पोलिस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.

  • Share this:

पणजी, 24 सप्टेंबर : गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन पोस्टर्समुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये राज्यात न्यूड पार्टीच आयोजन केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनारी ही न्यूड पार्टी होणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याची चौकशी सुरू केली असून राज्यात असे प्रकार होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, पार्टीमध्ये 15 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश आहे. या पार्टीत हवं तसं सेक्स करता येईल असंही पोस्टरवर नमूद केलं आहे. या पोस्टर्सची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पोस्टरवर पार्टी कधी आणि नेमकं कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या पोस्टरवर देण्यात आलेल्या नंबरवर फोनही सातत्यानं व्यस्त लागत असल्याची माहिती तिथल्या स्थानिक न्यूज चॅनलनं दिली आहे. त्यामुळे खरंच अशा प्रकारची पार्टी होणार आहे की फक्त एक अफवा पसरवली हे समजू शकले नाही. पोलिस या प्रकऱणाची कसून चौकशी करत आहेत.

गोवा महिला काँग्रेस अध्यक्षांनी या पोस्टरवरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. प्रतिमा कोटिन्हो यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.

गोव्यातील पार्टी आणि तिथलं नाइट लाइफ प्रसिद्ध आहे. पण अशा प्रकारच्या पार्टीला तिथं परवानगी नाही. नुकतंच गोवा सरकारनं स्थानिक संस्कृती टिकून राहण्यासाठी अनेक नियम लागू केले होते. त्यामध्ये उघड्यावर दारू पिण्यावर बंदी घातली होती.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

Published by: Suraj Yadav
First published: September 24, 2019, 12:23 PM IST
Tags: goa

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading