पणजी, 26 जून : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GBSHSE) 12 वीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गोवा बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचे निकाल शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहेत.
18,150 विद्यार्थ्यांनी यंदा गोवा बोर्डाची बारावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल gbshse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपण संध्याकाळी 5 वाजता पाहू शकता. कला शाखेतील 4,523 वाणिज्य शाखेचे 5,593, वोकेशनल 2,920 आणि विज्ञान शाखेच्या 5,114 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी निकाल ऑनलाइन जारी करण्यात येईल त्यानंतर 7 दिवसांनी हा निकाल म्हणजे 7 जुलैला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहेत.
हे वाचा-CBSC Board Exam 2020: मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा रद्द
कोरोनाचा संसर्ग आणि वाढता धोका लक्षात घेऊन 20 मार्चनंतर परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. 20 मे ते 22 मे 2020 या कालावधीत प्रलंबित एचएसएससी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत एकूण 19,680 विद्यार्थी उपस्थित राहिले होते. गुणपत्रिका मिळण्याबाबत बोर्ड आणि महाविद्यालय एकत्रित निर्णय घेऊन घोषणा करेल असं सांगण्यात आलं आहे.
निकाल कसा पाहाल
gbshse.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या लिंकवर क्लिक केल्यानंतर Goa HSSC Result 2020 असं लिहिलेलं असेल. तिथे आवश्यक ते तपशील भरून आपला निकाल आपण पाहू शकता. या निकालाची आपण प्रिंट किंवा पीडीएफ फाईल तुम्ही घेऊ शकता.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 12th, 12th exam result, Goa, Goa news, HSC, HSC Board, Hsc exam, HSC Result