'इथ एखादी व्यक्ती आमदार झाली की त्यांना वेड लागतं'

'इथ एखादी व्यक्ती आमदार झाली की त्यांना वेड लागतं'

  • Share this:

पणजी, 03 डिसेंबर: सध्याची राजकीय परिस्थिती इतकी बिघडली आहे की, एखादा व्यक्ती आमदार झाला की त्याला वेडच लागतं; हे अन्य कोणी नाही तर एका राज्याच्या राज्यपालांनी म्हटले आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांनी राजकारणात नैतिकता आणली. त्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजेत. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत आमदारकी मिळाली की काहींना वेड लागते.

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal malik)यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. महात्मा गांधी यांनी राजकारणातील नैतिकता काय असते हे दाखवून दिले होते. सार्वजनिक जीवनातील ते बुद्ध होते. महात्मा गांधी यांनी सर्वांना सार्वजनिक आयुष्यात नैतिकता स्विकारण्यास सांगितले होते. पण सत्ता मिळवण्यासाठी सध्या चढाओढ सुरु आहे. आपल्या देशात एखादी व्यक्ती आमदार झाली की त्याला वेड लागतं. अशा व्यक्तींनी गांधीजींपासून शिकण्याची गरज आहे.

राजकारणातील गांधींजींचे उत्तराधिकाऱ्यांना देखील त्यांच्या गुणांचा विसर पडला आहे. राम मनोहर लोहिया यांचा संदर्भ देत मलिक म्हणाले, लोहियांच्या मते गोडसेने गांधीजींची हत्या केली. पण त्यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्यांनी गांधींच्या आत्म्याची हत्या केली. गांधींजींच्या गुणांचा त्यांना विसर पडला आणि चरख्या पुरते त्यांना मर्यादीत ठेवले.गांधीजींना जगाला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे सत्याग्रह होय, असे मलिक यांनी सांगितले.

गोव्याचे राज्यपाल होण्याआधी मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी 3 नोव्हेंबर रोजी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 12:34 PM IST

ताज्या बातम्या