गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उद्या परीक्षा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उद्या परीक्षा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.

  • Share this:

पणजी, 19 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.

गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोवा विधानसभेतलं आपलं संख्याबळ सिद्ध करावं लागेल. यासाठी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी विधिमंडळाचं विशेष सत्र बोलावलं आहे. गोवा विधानसभेत सकाळी साडेअकरा वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.

गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी 21 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा भाजपप्रणित सरकारने केला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि 3 अपक्षांचा पाठिंबा मिळवून हे सरकार स्थापन झालं आहे.

याआधी मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसुझा यांचं निधन झाल्यामुळे गोव्यातलं भाजपचं सरकार अल्पमतात आलं होतं. त्यासोबतच सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या काँग्रेस आमदारांनी राजीनामेही दिले होते.

काँग्रेसचे गोव्यामध्ये 14 आमदार आहेत. त्यामुळे आपणच राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने सरकारस्थापनेचा दावाही केला होता पण अखेर सरकार स्थापन झालं ते भाजपचंच.

आता सत्तेत असलेल्या भाजपकडे 12, महाराष्ट्र गोमंतक पक्षाकडे 3, गोवा फॉरवर्ड पक्षाकडे 3 आमदार आहेत.  3 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे 14 आमदारांचं संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या सहकारी पक्षातल्या एका आमदाराने जरी पाठिंबा काढला तरी त्यांचं गोव्यातलं सरकार धोक्यात येऊ शकतं.

मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर त्याच मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.त्यांच्यासोबत मंत्र्यांचेही शपथविधी झाले.या सरकारला कामाला सुरुवात करण्याआधी विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पाडावी लागणार आहे.

===============================================================================================

First published: March 19, 2019, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading