गोव्याला मिळाले 4 नवीन मंत्री, 'या' नेत्यानं घेतली उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ

गोव्यामध्ये काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या 10 पैकी तीन आमदारांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 06:04 PM IST

गोव्याला मिळाले 4 नवीन मंत्री, 'या' नेत्यानं घेतली उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ

पणजी, 13 जुलै : गोव्यामध्ये काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या 10 पैकी तीन आमदारांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. शनिवारी (13 जुलै) गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. एकूण चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.  चंद्रकांत कवळेकर, फिलीप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह मायकल लोबो यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्यात आली आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

(वाचा :कर्नाटकातील डाव भाजपवरच उलटणार? काँग्रेसच्या खेळीने पुन्हा नवं वळण)

काँग्रेसच्या दहा आमदारांनी बुधवारी (10 जुलै) भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपचे संख्याबळ 27 झाले आहे.  यानंतर शुक्रवारी (12 जुलै)मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळात सहभागी असलेले गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आणि अपक्ष रोहन खंवटे यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला.

सावंत यांनी तीन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा फेरबदल झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या फेरबदलात त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री सुदीन धवळीकर यांना हटवून दीपक पुष्कर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता.

(वाचा :ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?)

VIDEO : पालकांनो, बाळांकडे लक्ष द्या! चिमुरड्याने गिळले नाणे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...