मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोवा फॉरवर्ड पार्टीने सोडली NDA ची साथ, CM प्रमोद सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप

गोवा फॉरवर्ड पार्टीने सोडली NDA ची साथ, CM प्रमोद सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप

सरकार फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकलेलं असून जराही प्रामाणिकपणा शिल्लक नसल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

पणजी, 13 एप्रिल : गोव्यातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP)ने NDA ची साथ सोडली आहे. (GFP quits NDA) गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई (Vijay Sardesai wrote letter to Amit Shah)यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून हे जाहीर केलं आहे. त्यामुळं 2021 मध्ये होणाऱ्या आगामी विधानसबा निवडणुकीच्या तोंडावर गोवा भाजपला हा मोठा झटका समजला जात आहे.

(वाचा -"सेलिब्रेटींना सुद्धा कोरोनाचा धसका; कमी लक्षण असतानाही होतात रुग्णालयात दाखल")

भाजप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्या गेल्या काही दिवसांपासून तणाव असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं. गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी भाजपच्या सरकारवर अनेक आरोपही केले होते. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील गोवा सरकारचे अनेक निर्णय हे अँन्टी गोवा धोरणाला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे गोव्याच्या जनतेबरोबर केलेला अविश्वास आहे. सरकार फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विजय सरदेसाई यांनी लावला आहे. सरदेसाई यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकलेलं असून जराही प्रामाणिकपणा शिल्लक नसल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

पत्रातून केले गंभीर आरोप

जुलै 2019 पासून राज्यातील नेतृत्वानं गोव्यातील जनतेकडं पाठ फिरवली आहे. लोकांना सर्वंकश विकासाची अपेक्षा होती पण की अपेक्षा फोल ठरली. पर्रिकर यांच्या दुर्दैवी निधनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले आणि राज्यात भ्रष्टाचाराचा खेळ सुरू झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी पत्रातून केला आहे. सामान्य गोवेकरांचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. गोव्यातील अनोखी जीवनशैली, येथील समृद्ध वारसा, पर्यावरण आणि जीवनमान यालाच धोका निर्माण झाल्याचंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

(वाचा -महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सावट; पुढील 3 दिवासांत या जिल्ह्यांत पावसाची हजेरी)

पुढील वर्षी निवडणुका

गोव्यात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका नियोजित आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पार्टीचा हा निर्णय भाजपला काहीसा अडचणीत आणणारा ठरू शकतो, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. गोवा फॉवर्ड पक्षाने 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधी भूमिका घेत निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्यांच्या तीन आमदारांना पर्रिकरांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. पण पर्रिकरांच्या निधनानंतर या तिन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली.

First published:

Tags: Goa, NDA