कर्नाटकातील बंदीमुळे गोव्यात 'बिफ'चा तुटवडा, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

कर्नाटकातील बंदीमुळे गोव्यात 'बिफ'चा तुटवडा, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

कर्नाटकातील भाजपा सरकारनं नुकतेच गोवंश हत्या बंदी कायदा (Prevention of Slaughter and Cattle bill 2020) लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्याने ऐन फेस्टिव्हलच्या काळात गोव्यात बिफचा (Beef) तुटवडा निर्माण झाला आहे

  • Share this:

पणजी, 17 डिसेंबर :   पर्यटनाचे आकर्षणबिंदू (Tourist spot) असलेला गोवा (Goa) आता ख्रिसमस (Christmas)  आणि नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी सज्ज होत आहे. कोरोनाचा (COVID19) फटका बसलेल्या गोव्यातील पर्यटन उद्योगाला आता शेजारच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा फटका बसला आहे.

कर्नाटकातील भाजपा सरकारनं नुकतेच गोवंश हत्या बंदी कायदा (Prevention of Slaughter and Cattle bill 2020) लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्याने ऐन फेस्टिव्हलच्या काळात गोव्यात बिफचा (Beef) तुटवडा निर्माण झाला आहे. या प्रकरणात कर्नाटक सरकारशी बोलून सर्व पुरवठा सुरळीत करण्यात येईल असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिले आहे.

गोव्यातील उद्योग संकटात!

कर्नाटकातून गोव्यात मागच्या गुरुवारी शेवटचा स्टॉक आला होता. तो स्टॉक संपल्यानं अनेक बीफ शॉप बंद झाले आहेत. तसंच उर्वरित दुकानंही लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कर्नाटक सरकारच्या नव्या कायद्यानुसार राज्यातून गुरांच्या मांस विक्री करणे तसेच बाहेरच्या राज्यात त्याचा पुरवठा करण्यास बंदी आहे.

गोव्यातील कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशननं या प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यावेळी बीफ पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचं आश्वासन सावंत यांनी या शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणात राज्यातील पशुसंवर्धन मंडळाचे सचिव तसंच संचालकांची लवकरच बैठक घेणार असल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या